महाराष्ट्रावर दुहेरी संकट! ३१ जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट जारी

राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला असून 12 जून रोजी हवामानात मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांना उष्णतेचाही इशारा देण्यात आला आहे. (weather) त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना एकाच वेळी पाऊस आणि वाढत्या तापमानाचा सामना करावा लागू शकतो.

24 जिल्ह्यांत पावसाचा इशारा भारतीय हवामान विभाग यांनी राज्यातील विविध भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. एकूण 24 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हवामान सक्रिय राहणार आहे. (weather) कोल्हापूर, सातारा , सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात उष्णतेचा इशारा कायम असला तरी घाटमाथ्याच्या भागात हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जालना , परभणी , बीड , हिंगोली , नांदेड , लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

उष्णतेचा इशारा कायम मुंबई महानगर क्षेत्रातील पालघर , ठाणे , मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दिवसाचे तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे तसेच पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो. (weather) मात्र नाशिकच्या घाट परिसरात तसेच जळगाव जिल्ह्यात काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती , बुलढाणा, नागपूर , वर्धा , भंडारा , गोंदिया , चंद्रपूर गडचिरोली , वाशिम आणि यवतमाळ येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील या सततच्या बदलामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील काही दिवस मान्सूनपूर्व हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?

तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

सोनसाखळी चोरणारे चौघे जेरबंद