जगातील सर्वात महागड्या आणि दुर्मिळ फळांपैकी एक मानला जाणारा जपानी मियाझाकी आंबा आता भारतीय शेतकऱ्यांच्या बागांमध्येही दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपयांना विकला जाणारा हा प्रीमियम आंबा भारतातही यशस्वीपणे पिकवला जात असून कृषी क्षेत्रात त्याची मोठी चर्चा रंगली आहे. उच्च दर्जाची गुणवत्ता, आकर्षक रंग, उत्कृष्ट चव आणि मर्यादित उत्पादन यामुळे या आंब्याला फळांमधील ‘कोहिनूर’ असेही संबोधले जाते.मूळचा जपानमधील मियाझाकी प्रांतात विकसित झालेला हा आंबा पूर्णपणे पिकल्यावर गडद लाल आणि जांभळ्या छटेचा दिसतो. (Mangoes) त्याच्या आकर्षक रूपामुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे जागतिक बाजारपेठेत त्याला मोठी मागणी आहे. जपानी भाषेत या आंब्याला ‘ताइयो नो तामागो’ म्हणजेच ‘सूर्याची अंडी’ असे म्हटले जाते.

भारतातील अनेक प्रगतशील शेतकरी आता या आंब्याच्या लागवडी कडे वळत आहेत. बिहारमधील भागलपूर आणि उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे या आंब्याचे यशस्वी उत्पादन घेतले जात असल्याचे समोर आले आहे. (Mangoes) तसेच ओडिशा आणि कर्नाटकमधील काही शेतकरीही या विदेशी वाणाची लागवड करून बाजारपेठेतील संधी शोधत आहेत.मियाझाकी आंब्याचे उत्पादन घेण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. नियंत्रित वातावरण, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याची लागवड केली जाते. फळांच्या गुणवत्तेसाठी प्रत्येक आंब्याची स्वतंत्र देखभाल केली जाते. त्यामुळे उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो.
या आंब्याची आणखी एक खासियत म्हणजे त्यातील गोडवा. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार या आंब्यात साखरेचे प्रमाण अत्यंत जास्त असते. (Mangoes) त्याचा गर मऊ, रसाळ आणि तंतुविरहित असल्यामुळे खाण्याचा अनुभव इतर आंब्यांपेक्षा वेगळा आणि अधिक प्रीमियम मानला जातो.आरोग्याच्या दृष्टीनेही मियाझाकी आंबा महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये बीटा-कॅरोटीन, फॉलिक ॲसिड आणि विविध प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा आंबा उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.भारतात या आंब्याची लागवड वाढू लागल्याने शेतकऱ्यांसाठी उच्च उत्पन्नाचे नवे दालन खुले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. योग्य तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा आधार मिळाल्यास मियाझाकी आंबा भारतीय कृषी क्षेत्रात नवा आर्थिक पर्याय ठरू शकतो.
हेही वाचा :
आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू