शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याबरोबरच पालकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. (School bus) जून २०२६ पासून राज्यभरासह शहरातही स्कूल बस आणि खासगी स्कूल व्हॅनच्या शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ लागू करण्यात आली आहे. इंधन दरवाढ, वाहन देखभाल खर्च, विमा, टोल आणि चालक-कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या वेतनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बस व व्हॅनमालक संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यावर भ या दरवाढीमुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर पालकांचे मासिक बजेट कोलमडले आहे. राज्य सरकार, परिवहन मंत्रालय आणि अंमलबजावणी प्राधिकरणांकडे पालकांवरील भार टाळण्यासाठी सहायक यंत्रणा आणि पर्यायी उपायांची विनंती करणारी अनेक निवेदने शालेय वाहन चालक-मालक संघटनेकडून सादर करण्यात आली होती.मात्र, प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद किंवा सुधारणात्मक कारवाई मिळाली नाही, असे संघटनेने माहिती दिली. (School bus) त्यामुळे वारंवार निवेदने देऊनही या क्षेत्रासाठी कोणताही दिलासादायक उपाय न मिळाल्याने शालेय वाहन चालक-मालक संघटनेकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय बस वाहतूक शुल्कात जून २०२६ पासून १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण महागाईसोबतच, ऑपरेटर्सना इंधनाच्या किमती, चालक आणि कर्मचाऱ्यांचे पगार, वाहनांच्या देखभालीचा खर्च, सुटे भाग, विम्याचे हफ्ते, टोल शुल्क, परवाने आणि अंमलबजावणीशी संबंधित दंड यांमध्ये होणाऱ्या तीव्र वाढीचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आलेला असताना आम्ही शासनाकडे महागाईवर अंकुश घालावा, असे पर्यायी उपायांची विनंती करणारी निवदेन वारंवार केले होते. (School bus) परंतु शासनाकडून कोणतेही पाऊल उचलले नसल्याने सांगितल्याप्रमाणे ही दरवाढ झालेली आहे.अजीम सय्यद, जिल्हाध्यक्ष, शालेय वाहनचालक-मालक संघटना वाहनांच्या देखभालीचा खर्च, सुटे भाग आदी वस्तूंचे भाव वाढले असून, पेट्रोल-डिझेलमध्ये झालेल्या भाववाढीमुळे संघटनेकडून आलेल्या निर्णयानुसार स्कूल बस आणि खासगी स्कूल व्हॅनच्या शुल्कात वाढ झाली आहे.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर