महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असून, सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीपूर्वी कार्ड सक्रिय करून घेणे आवश्यक ठरणार आहे.

स्मार्ट कार्ड नोंदणीला नागरिकांचा प्रतिसाद परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे एसटी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने होणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. (ST travel) त्यापैकी जवळपास २५ लाख कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डे सुरू करण्याचे काम वेगाने सुरू असून, संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर कार्ड कार्यान्वित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वितरण केंद्रांवर प्रशासनाचे विशेष लक्ष “स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे,(ST travel) यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर वितरण यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दूरवर प्रवास करण्याची गरज भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई केली जाणार असून, अशा केंद्रांचा परवाना रद्द करण्यासह प्रशासकीय कारवाईही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे तिकीट खरेदी प्रक्रिया सुलभ होणार असून सवलतींची पडताळणी अधिक वेगाने करता येणार आहे. प्रवाशांची माहिती सुरक्षित ठेवण्यासह एसटी सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. भविष्यात सार्वजनिक वाहतुकीच्या इतर सेवांमध्येही या कार्डचा वापर वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (ST travel) त्यामुळे १ ऑगस्ट २०२६ पूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते सक्रिय करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा :
पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग