भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून वारणा धरणासह तालुक्यातील सर्व धरणातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये (forecast) यासाठी धरणांमधून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. धरणांमधून ५०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. गतवर्षीपेक्षा २.२६ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

धरणे, जलाशय असतील आता केवळ आणि केवळ पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने कंबर कसली आहे.पाणी टंचाईच्या काळात (forecast) अनेक ठिकाणी धरणे, नद्या, कालवे आणि तलावांमधून बेकायदेशीर पाणी उपसा केला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभागाचे ‘संयुक्त पथक’ तयार करण्यात येणार आहे. (forecast) हे पथक जलस्रोतांवर गस्त घालणार असून अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप जप्त करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करणार आहे.
हेही वाचा :
पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग