ब्रेकिंग भारतात टेलिग्राम बॅन! कारणास्तव कोट्यवधी युजर्सना मोठा झटका?

नीट (NEET UG) 2026 पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात (Telegram) असून, टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पाऊल 21 जून 2026 रोजी होणाऱ्या नीट (यूजी) पुनर्परीक्षेदरम्यान पेपरफुटी, फसवणूक आणि अनधिकृत माहितीची देवाणघेवाण रोखण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय चाचणी संस्था यांनी संयुक्तपणे उपाययोजना केल्याचे सांगितले जात आहे. (Telegram) याच अनुषंगाने टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर विशेष लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दाव्यानुसार, राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने टेलिग्रामवरील सार्वजनिक प्रवेशावर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. परीक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परीक्षेच्या आधी, परीक्षेदरम्यान आणि त्यानंतरचे काही महत्त्वाचे दिवस लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आल्याचा दावा आहे.

आयटी कायद्यांतर्गत कारवाईचा दावा राष्ट्रीय चाचणी संस्थेने जारी केल्याचे सांगितल्या जाणाऱ्या निवेदनानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कलम 69अ चा वापर करून आपत्कालीन अधिकार लागू केले आहेत.या माहितीनुसार, भारतातील टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक प्रवेश 22 जून 2026 पर्यंत प्रतिबंधित करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. (Telegram) तसेच, टेलिग्रामवरील आधी पाठवलेल्या संदेशांमध्ये बदल करण्याची सुविधा 30 जून 2026 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. परीक्षेची विश्वासार्हता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी यासंदर्भातील अधिकृत तपशील आणि अंमलबजावणीबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?