सहकाऱ्याला वाचवताना तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू नृसिंहवाडी येथे अमावास्येच्या स्नानादरम्यान दुर्दैवी घटना

अमावास्येनिमित्त नृसिंहवाडी येथे श्री दत्त दर्शन आणि स्नानासाठी आलेल्या इचलकरंजीतील एका तरुणाचा (Ichalkaranji) सहकाऱ्याला वाचवताना कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राम कुशलराम (रा. कापड मार्केट, इचलकरंजी, मूळ रा. राजस्थान) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमावास्येनिमित्त राम हे आपल्या सहकाऱ्यांसह नृसिंहवाडी येथे आले होते. पहाटेच्या सुमारास नदीत स्नान करत (Ichalkaranji) असताना त्यांच्या एका सहकाऱ्याचा खोल पाण्यात तोल जाऊन तो बुडू लागला. ही बाब लक्षात येताच राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली.राम यांनी धाडस दाखवत सहकाऱ्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते स्वतःच पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडाले. घटनेची माहिती मिळताच वजीर रेस्क्यू फोर्सच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.

सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राम यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. (Ichalkaranji) सहकाऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या राम यांच्या धाडसाची परिसरात चर्चा होत असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.या घटनेची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?