अंबाबाई मंदिर प्रदक्षिणा मार्ग, राम मंदिर संवर्धनाचा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार?

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरातील राम मंदिर जतन आणि संवर्धन कामाचा शुभारंभ शनिवारी (दि.२०) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. (Ambabai Temple) यासह विविध कार्यक्रमांसाठी शहा दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी (दि.१९) रात्री त्यांचे दिल्लीहून कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. शनिवारी रात्री ते दिल्लीला रवाना होतील. त्यांच्या या दौऱ्याची महायुतीसह जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने शहा यांच्या उपस्थितीत ‘कृतज्ञता मेळावा आणि जाहीर सभा’ आयोजित केली आहे. पोलिस परेड ग्राऊंडवर शनिवारी (दि.२०) दुपारी १२ वाजता ही सभा होणार आहे. (Ambabai Temple) तत्पूर्वी सकाळी ९ ते १२ या वेळेत ते अंबाबाई मंदिर परिसरातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन ते विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी करणार आहेत. यासह आराखड्याबाबत चर्चाही करणार आहेत. शनिवारी दुपारी ते इचलकरंजीकडे रवाना होणार आहेत. कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या मुख्य कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. यानंतर दुपारी चार वाजता केएटीपी मैदानावर सभा घेणार आहेत. (Ambabai Temple) यानंतर रात्री कोल्हापूर विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी