LPG गॅस ग्राहकांनो ३० जूनपूर्वी काम पूर्ण करा अन्यथा सबसिडी होणार बंद?

घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. गॅस सबसिडीचा लाभ अखंडपणे मिळत राहावा (gas cylinders) यासाठी सरकारने ग्राहकांना 30 जूनपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. निर्धारित मुदतीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास सबसिडी खात्यात जमा होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

ई-केवायसीमागील सरकारचा उद्देश गॅस सबसिडीचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि बनावट किंवा डुप्लिकेट कनेक्शनवर नियंत्रण मिळवता यावे, (gas cylinders) यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेमुळे एका व्यक्तीकडे एकाच कनेक्शनवर सबसिडीचा लाभ असल्याची खात्री केली जाईल आणि योजनांचा गैरवापर रोखण्यास मदत होईल.गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी कनेक्शनची माहिती अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. ज्या ग्राहकांनी दीर्घकाळापासून त्यांच्या कनेक्शनची पडताळणी केलेली नाही, त्यांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक ठरू शकते. वेळेत ही प्रक्रिया न केल्यास सबसिडीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो किंवा ती थांबण्याची शक्यता आहे.

घरबसल्या आणि एजन्सीतून अपडेटची सुविधा ग्राहकांच्या सोयीसाठी गॅस कंपन्यांनी ई-केवायसीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक संबंधित गॅस कंपनीचे मोबाईल अॅप किंवा अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून ई-केवायसी किंवा री-केवायसीचा पर्याय निवडू शकतात. (gas cylinders) त्यानंतर मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने फेस व्हेरिफिकेशन केल्यानंतर माहितीची पडताळणी होऊन प्रक्रिया पूर्ण होते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसून काही मिनिटांत काम पूर्ण होऊ शकते.

ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया करणे शक्य नाही, ते जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरक कार्यालयात जाऊनही ई-केवायसी करू शकतात. यासाठी आधार कार्डची प्रत, गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे आवश्यक आहे. एजन्सीत बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ओळख सत्यापित केली जाऊ शकते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गॅस कनेक्शन सक्रिय राहील आणि भविष्यात सबसिडी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. (gas cylinders) त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता ग्राहकांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी