सोमालियाची राजधानी मोगदिशूमध्ये प्रवाशांचं विमान टेकऑफनंतर (crashes) काही मिनिटांत समुद्रात कोसळल्याची घटना घडली आहे. मएडन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. प्रवाशांचं विमान हे मोदादिशून येथून गुरिएल शहारात निघालं होतं. विमानात ५० प्रवासी आणि ५ क्रू मेंबर होते. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.उड्डाण घेतल्यानंतर १५ मिनिटांत विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा विमानतळावर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याला पूर्णपणे विमानावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. ५० प्रवाशांनी भरेललं विमान समुद्राच्या किनाऱ्यावर कोसळलं. विमान कोसळल्यानंतर किनाऱ्याजवळ एकच धावाधाव झाली.

व्हायरल व्हिडिओमध्ये विमान जमिनीवर कोसळल्याचं पाहायला मिळालं.(crashes) विमान जमिनीवर कोसळल्यानंतर प्रवासी घाईघाईने बाहेर आले. घटनास्थळी सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक घटनास्थळी पोहोचले होते. दुर्घटनेनंतर विमानाचा एक दरवाजा उघडलेला पाहायला मिळाला. विमान हे स्टार्स्की एअरलाइन्सचे होतं. ही विमान कंपनी सोमालियाच्या प्रमुख एअरलाइन्समध्ये समावेश आहे.
Today, Fokker 50 incident in Somalia. First info states all aboard survived and that incident occurred during take-off from Aden Adde airport, Mogadishu. Aircraft was operated by StarSky airlines. Updates when possible. Express UK pic.twitter.com/AYGDv97sNz
— Air Safety #OTD by Francisco Cunha (@OnDisasters) February 10, 2026
सोमाली सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीचे डायरेक्टर अहमद मुअल्लिम हसन (crashes) यांनी सांगितलं होतं की, विमानात एकूण ५५ जण होते. त्यात ५० प्रवाशांचा समावेश आहे. तर ५ क्रू मेंबरचा समावेश होते.विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘विमानाला आग लागण्याची भीती होती. समुद्राजवळ विमान कोसळल्यानंतर बचाव कार्य सुरू केलं होतं. या दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं. विमानतळ प्रशासनाने दुर्घटना कशी झाली, याचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटीEdit