आलासात FDA छाप्यापूर्वीच पेढ्यांची कृष्णा नदीत विल्हेवाट?माहिती फुटल्याच्या चर्चेला उधाण?

आलास (ता. शिरोळ) येथील खवा व पेढा निर्मिती केंद्रावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने गुरुवारी (दि.१८) सकाळी छापेमारी करून नमुने घेतले. मात्र, या कारवाईपूर्वीच पहाटे मोठ्या प्रमाणावर पेढ्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली असून छाप्याची माहिती संबंधितांपर्यंत आधीच पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे काही प्रमाणात पेढे कृष्णा नदी परिसरात टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Khava and Pedha) त्यानंतर काही तासांतच अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई झाल्याने छाप्याची गोपनीय माहिती आधीच फुटली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, छापेमारीनंतर नमुने घेऊन परतत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाहन आलास-शहापूरे मार्गावरील एका शेताजवळ काही काळ थांबले होते, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी कारवाई झालेल्या संबंधित व्यक्तींशी अधिकाऱ्यांची चर्चा झाल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जात आहे. (Khava and Pedha) त्यामुळे संपूर्ण कारवाईबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी दीपा फावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.आलास परिसरात बाहेरून आणल्या जाणाऱ्या खव्यामध्ये विविध पदार्थांची भेसळ करून पेढे तयार केले जात असल्याची चर्चा काही काळापासून सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईनंतर संबंधितांनी तयार मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नोटाबंदीनंतर २५ कोटींच्या नोटा 10 वर्षे जिल्हा बँकेत धूळ खात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच छाप्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचली का, (Khava and Pedha) याची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. याशिवाय कृष्णा नदी परिसरात अन्नपदार्थ किंवा अन्य साहित्य टाकून प्रदूषण केले असल्यास त्याचीही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

विधान परिषदेसाठी आज होणार मतदान?

SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती जाणून अर्ज प्रक्रिया?