आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 11 फेब्रुवारी रोजी क्रिकेट चाहत्यांना (T20 World Cup) जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला. डी ग्रुपमधील दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आणि हा सामना डबल सुपर ओव्हरपर्यंत गेला.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 188 धावांचा आव्हानात्मक स्कोर उभारला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने जोरदार लढत देत 187 धावांपर्यंत मजल मारली. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. पहिली सुपर ओव्हरही टाय ठरल्याने सामना अधिक रोमांचक बनला. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत 4 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील (T20 World Cup) सलग दुसरा सामना जिंकत सुपर 8 साठी आपला दावा मजबूत केला आहे. न्यूझीलंडनंतर डी ग्रुपमधून सलग दोन सामने जिंकणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचा सलग दुसरा पराभव झाल्याने त्यांची स्पर्धेतील स्थिती कठीण झाली आहे.
अफगाणिस्तानने संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले, मात्र नशिबाची साथ लाभली नाही. आता उर्वरित सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवत नेट रनरेट सुधारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यांच्या पुढील लढती यूएई आणि कॅनडा विरुद्ध होणार आहेत.

सध्याच्या परिस्थितीत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका (T20 World Cup) हे दोन्ही संघ गटात अव्वल स्थानी असून सुपर 8 मध्ये प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. अफगाणिस्तानसाठी मात्र पुढील समीकरणे अवघड असून त्यांचे भवितव्य इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी