पुढील आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्या तारखांना बँका राहणार बंद?

22 जून ते 28 जून 2026 या कालावधीत बँकिंगसंबंधित महत्त्वाची कामे असणाऱ्यांनी आधी सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासून घेणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, पुढील आठवड्यात देशातील सार्वजनिक आणि खासगी बँका एकूण चार दिवस बंद राहणार आहेत. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि धार्मिक सणांच्या आधारे या सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या असून (holiday) काही सुट्ट्या विशिष्ट राज्यांपुरत्याच मर्यादित आहेत.

पुढील आठवड्यातील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक भारतीय रिझर्व्ह बँकेने जून 2026 महिन्यासाठी एकूण 11 बँक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. या सुट्ट्यांमध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि सर्व रविवारी होणाऱ्या नियमित सुट्ट्यांचाही समावेश आहे. 22 जून, सोमवारी रथयात्रेनिमित्त ओडिशा , पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील. त्यानंतर 25 जून, गुरुवारी मोहरमच्या निमित्ताने केवळ विजयवाडा , आंध्र प्रदेश येथे बँकांना सुट्टी असेल. 26 जून, शुक्रवारी मोहरम किंवा आशुरानिमित्त देशातील बहुतांश शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दिल्ली , मुंबई , कोलकाता, चेन्नई , हैदराबाद , बंगळूर , पाटणा , जयपूर आणि भोपाळ यांसह (holiday) अनेक प्रमुख शहरांचा समावेश आहे.

सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांना सूचना 27 जून हा महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका बंद राहतील. त्यानंतर 28 जून रोजी नियमित साप्ताहिक सुट्टी असल्याने रविवारीही बँकांचे व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे काही राज्यांतील ग्राहकांना सलग तीन दिवस बँका बंद राहण्याचा परिणाम जाणवू शकतो. विशेषतः उत्तर प्रदेश , महाराष्ट्र आणि बिहार येथील नागरिकांसाठी 26 जून ते 28 जून दरम्यान सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट प्रक्रिया, रोख रक्कम जमा करणे किंवा इतर शाखास्तरीय कामे 25 जूनपूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.मात्र, बँकांच्या शाखा बंद असल्या तरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय , गुगल पे , फोनपे आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे 24 तास उपलब्ध राहतील. (holiday) त्यामुळे ग्राहकांना डिजिटल व्यवहारांद्वारे बँकिंग सेवा वापरता येणार आहेत.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?