मध्यरात्री अचानक जाग येते ? ठरू शकतं धोक्याचं, जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे आणि उपाय?

रात्री शांत झोप लागल्यानंतर अचानक पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास जाग येणे आणि त्यानंतर पुन्हा झोप न लागणे ही समस्या अनेकांना सतावत असते. अनेकजण याकडे तणाव किंवा थकव्याचा परिणाम म्हणून पाहतात, मात्र हा त्रास वारंवार होत असेल तर तो शरीरातील काही बदल किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, मानवी झोप ही विविध टप्प्यांमधून जात असते. सुरुवातीच्या काळात शरीर गाढ झोपेत असते, तर पहाटेच्या दिशेने झोप हलकी होत जाते. या काळात अगदी किरकोळ आवाज, खोलीतील तापमानातील बदल, मानसिक ताण किंवा मनात सुरू असलेले विचार यांमुळेही झोप मोडू शकते. (sleep and being) त्यामुळे पहाटेच्या सुमारास जाग येण्याची शक्यता अधिक असते.

यामागे शरीराचे जैविक घड्याळही महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील सर्केडियन रिदम झोप आणि जागेपणाचे चक्र नियंत्रित करत असते. पहाट जवळ येत असताना शरीरात काही संप्रेरकांची पातळी वाढू लागते, ज्यामुळे मेंदू अधिक सक्रिय होतो. अशावेळी ॲसिडिटी, वारंवार लघवी लागणे, हार्मोन्समधील बदल, उशिरा किंवा जड जेवण, अनियमित झोपेची वेळ आणि झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर यांसारख्या सवयी समस्या अधिक वाढवू शकतात. अचानक जाग आल्यानंतर अनेकजण घड्याळ पाहून उरलेल्या झोपेचा हिशोब करू लागतात. (sleep and being) यामुळे तणाव वाढून पुन्हा झोप येणे आणखी कठीण होते. त्याचप्रमाणे मोबाईलचा वापर केल्यास स्क्रीनमधून येणारा प्रकाश मेंदूला जागृत ठेवतो आणि झोपेची भावना कमी होते. त्यामुळे अशा वेळी शांत राहणे आणि अनावश्यक विचार टाळणे आवश्यक ठरते.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ही समस्या अधूनमधून होत असेल तर ती गंभीर नसते. मात्र दररोज झोप मोडत असेल, दिवसभर थकवा जाणवत असेल किंवा चिडचिड वाढत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. चांगली आणि अखंड झोप मिळवण्यासाठी झोपण्याच्या एक-दोन तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा. रात्रीचे जेवण हलके आणि सहज पचणारे असावे. झोप न लागल्यास अंथरुणात तग धरून पडून राहण्याऐवजी शांत वातावरणात पुस्तक वाचणे किंवा श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.(sleep and being) तसेच दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे या सवयीमुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीराने दिलेले असे संकेत वेळेत ओळखणे महत्त्वाचे आहे. कारण चांगली झोप ही केवळ विश्रांतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक मानली जाते.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?