काही एअरलाइन्समध्ये 13 नंबरची रो तर काहींमध्ये 17 नंबरची(airlines) रो मुद्दाम टाळली जाते, म्हणजेच विमानात तुम्हाला या रो दिसत नाहीत पण असं का ते तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल, तर बहुतेक वेळा (airlines)तुम्ही थेट तुमच्या सीटवर जाऊन बसला असाल, हातातील सामान वरच्या कॅबिनमध्ये ठेवला असेल आणि तुमच्या आरक्षित सीटवर आरामात स्थान घेतले असेल. बहुतेक प्रवासी असंच करतात. पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का, काही विमानांमध्ये 13 नंबरची रांग असतच नाही? म्हणजे सीट क्रमांक 12 नंतर थेट 14 वर जातो. हे काही चूक नसून, जगभरातील काही मान्यता आणि अंधश्रद्धांमुळे अनेक एअरलाइन्स ही पद्धत पाळतात. जसे घरं बांधताना किंवा हॉटेलमध्ये 13 नंबरचा रूम टाळण्याचा प्रघात असतो, तसंच हे विमानांतही दिसून येतं. चला, जाणून घेऊया कारण.
एअरलाइन्स 13 नंबरची रांग का टाळतात?
13 या अंकाची भीतीला इंग्रजीत “Triskaidekaphobia” म्हणतात. ही भीती खूप जुनी आहे आणि 1911 च्या एका अमेरिकन सायकोलॉजी जर्नलमध्येही याचा उल्लेख आहे. अनेकांच्या मते 13 हा अशुभ अंक आहे आणि त्याचा संबंध धार्मिक कथा, दंतकथा आणि परंपरांशी जोडला जातो.उदा : काही जण मानतात की “लास्ट सपर” यामध्ये जूडस हा 13वा पाहुणा होता, ज्याने ईसाला फसवले होते. काहींनी हा अंधविश्वास नॉर्स मायथॉलॉजीशीही जोडला आहे.
याशिवाय, अनेक संस्कृतींमध्ये 12 हा पूर्णत्वाचा प्रतीक मानला(airlines) जातो. त्यामुळे 13 हा अंक अपूर्ण किंवा नकारात्मक मानला जातो. प्रवाशांच्या मनातील ही भीती टाळण्यासाठी काही एअरलाइन्स 13 नंबरची रांग वगळतात, त्यामुळे सीट क्रमांक 12 नंतर थेट 14 येतो.
रांग 17 आणि इतर देशांचे अंधविश्वास
फक्त 13च नव्हे तर काही देशांत 17 हा अंकही अशुभ मानला जातो, जसे इटली आणि ब्राझीलमध्ये. यामागे कारण असे की, रोमन अंकांत 17 असे लिहिले जाते – XVII. हे उलटे केल्यास “VIXI” असे होते, ज्याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो – “मी जगलो आहे” किंवा “माझे आयुष्य संपले आहे”. लुफ्थांसा या जर्मन एअरलाइन्सनुसार, “आम्ही जगभरातील प्रवाशांच्या श्रद्धांचा आदर करतो, त्यामुळे काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 13 आणि 17 या दोन्ही रांगा नसतात.”
रो 13 टाळणाऱ्या काही प्रमुख एअरलाइन्स:
युरोप: Lufthansa, Ryanair, Iberia, ITA, KLM, Air France
मिडल ईस्ट: Emirates, Qatar Airways
आशिया: Singapore Airlines, Cathay Pacific, Thai Airways, Hong Kong Airlines
अमेरिकेत American Airlines, Delta, Southwest Airlines या 13 नंबरची रांग ठेवतात.
United Airlines मध्ये कधी कधी 13 आणि 14 दोन्ही रांगा नसतात, कारण चिनी संस्कृतीत 14 म्हणजे “मरणे” असा अर्थ घेतला जातो.
ब्रिटनमध्ये Virgin Atlantic मध्ये 13 नंबरची रांग नसते, पण British Airways, EasyJet, Jet2.com यामध्ये ती असते.
हेही वाचा :
फक्त ५ मिनिटांत बनवा झटपट आणि चविष्ट ‘दही चटणी टोस्ट’!
तुमचे दात मोत्यांसारखे चमकतील, फक्त ‘ही’ एक गोष्ट तुमच्या टूथपेस्टमध्ये करा मिक्स
कॉनव्हेनंतर रचीन रवींद्र-हेनरी निकोल्सचा झंझावात, न्यूझीलंड 600 पार, झिंबाब्वे विरुद्ध 467 धावांची भक्कम आघाडी