Punjab Kings ने IPL 2026 मध्ये दमदार फॉर्म कायम ठेवत आणखी एक भव्य विजय आपल्या नावावर केला. Lucknow Super Giants विरुद्ध झालेल्या या सामन्यात पंजाबने अक्षरशः (victory) धावांचा पाऊस पाडत 254 धावांचा डोंगर उभा केला आणि प्रतिस्पर्ध्याला दबावाखाली टाकलं.

Shreyas Iyer यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबला सुरुवातीला धक्का बसला असला तरी त्यानंतर Priyansh Arya आणि Cooper Connolly यांनी डाव सावरत आक्रमक खेळाची कमाल दाखवली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी करत लखनौच्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केलं. प्रियांशने अवघ्या 37 चेंडूत 93 धावांची धडाकेबाज खेळी करत शतकाच्या उंबरठ्यावरून परतावे लागले, तर कूपरने 87 धावांची महत्त्वाची खेळी साकारली.
या भक्कम फलंदाजीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 7 गडी गमावून 254 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांनी सुरुवात चांगली केली, मात्र त्यांना मोठी खेळी उभी करता आली नाही. Rishabh Pant यांनी 43 धावा करत झुंज दिली, तर Aiden Markram आणि Mitchell Marsh यांनीही योगदान दिलं. तरीही संघाला 200 धावांपर्यंतच मजल मारता आली.
पंजाबच्या गोलंदाजांनीही शिस्तबद्ध मारा करत प्रतिस्पर्ध्याला रोखलं. Marco Jansen याने महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर Arshdeep Singh आणि Yuzvendra Chahal यांनीही योगदान दिलं. या विजयासह पंजाबने स्पर्धेत आपला पाचवा विजय नोंदवला असून, त्यांची विजयी घोडदौड कायम राहिली आहे.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार