पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) नव्या प्रशासकीय संकुल ‘सेवा तीर्थ’चे उद्घाटन (Prime Minister) करत येथे अधिकृतपणे कामकाजाला सुरुवात केली. दुपारी साडेएक वाजता त्यांनी या इमारत संकुलाच्या नावाचे अनावरण केले. यानंतर ते नव्या पंतप्रधान कार्यालयात स्थलांतरित झाले. या संकुलामध्ये पंतप्रधान कार्यालयासह राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालयाचा समावेश आहे.

नव्या ठिकाणी कार्यभार स्वीकारताच पंतप्रधानांनी काही (Prime Minister) महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. पीएम राहत योजनेअंतर्गत ‘लखपती दीदी’ योजनेचे उद्दिष्ट दुप्पट करून ते ६ कोटी महिलांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी वाढवून तो २ लाख कोटी रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.० सुरू करण्यात आला आहे.
गेल्या काही दशकांपासून विविध मंत्रालये जुन्या आणि (Prime Minister) वेगवेगळ्या इमारतींमधून कार्यरत होती. त्यामुळे समन्वयाचा अभाव, वाढता देखभाल खर्च आणि कामकाजातील विलंब अशा समस्या निर्माण होत होत्या. मात्र आता अनेक मंत्रालये नव्या संकुलात एकत्र आणल्यामुळे प्रशासकीय कार्यपद्धती अधिक सुसंगत आणि परिणामकारक होणार आहे.
‘सेवा तीर्थ’सोबतच कर्तव्य भवन येथेही अत्याधुनिक आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढेल, निर्णय प्रक्रिया वेगवान होईल आणि नागरिकांचा सहभाग अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?