आमदार यड्रावकरांच्या पाठपुराव्याला यश टाकळीत उभारली जाणार नवी एमआयडीसी?

शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून मौजे टाकळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी करण्यासाठी ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Yadravkar) अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्याने तालुक्यातील औद्योगिक विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

या नव्या औद्योगिक क्षेत्रामुळे शिरोळ तालुक्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार असून युवकांना आपल्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. (Yadravkar) तसेच उद्योगांच्या माध्यमातून परिसरातील आर्थिक व्यवहार वाढून व्यापारी आणि सेवा क्षेत्रालाही फायदा होण्याची शक्यता आहे.

टाकळी येथे एमआयडीसी उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे आणि शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Yadravkar) मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे मानले जात आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिरोळ तालुका औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे उभा राहणार असून भविष्यात मोठ्या उद्योगांसह पूरक लघु व मध्यम उद्योगांनाही येथे संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. औद्योगिकीकरणामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक आणि उद्योजकांकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?

विधान परिषदेचा 17 जागांचा निकाल जाहीर?

प्रशासनाकडून पाणी व्यवस्थापनाचा बोजवारा?