कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरात सराईत गुंड सूरज हणमंत साखरे याच्यावर झालेल्या गोळीबाराचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून साखरेचा काटा काढण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या १२ तासांत कारवाई करत गोळीबार करणाऱ्या मुख्य शूटरसह त्याच्या साथीदाराला अटक केली.

कर्नाटकात पलायन करण्याच्या तयारीत असताना जयसिंगपूरजवळील अंकली पुल परिसरातून रफिक उर्फ देवा पीरसाहेब मुल्ला (वय ३९) आणि शहबाज राजू मुल्ला (वय २३) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणी आशुतोष अमित नाईक यांनी फिर्याद दिली आहे.गुरुवारी दुपारी सूरज साखरेवर झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. (shooting) चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, रफिक उर्फ देवा याने गोळीबार केला तर शहबाज दुचाकी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.तपासात आरोपींचे काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या सुपारीमागे अन्य टोळ्यांचा सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
रफिक मुल्लाविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून, २०१७ मध्ये कौटुंबिक वादातून स्वतःच्या वडिलांचा खून केल्याच्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती आहे. शहबाजवरही २०२४ मध्ये वाहन जाळपोळीचा गुन्हा नोंद असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.गोळीबारात वापरण्यात आलेले पिस्तूल कोल्हापूरातील एका व्यक्तीकडून मिळाल्याचा संशय असून, (shooting) त्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. शस्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीलाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सात विशेष पथके या तपासासाठी नियुक्त करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढत पोलिसांनी पहाटेच्या सुमारास दोघांना अटक केली.दरम्यान, सुपारी कोणी दिली, त्यासाठी किती रकमेचा व्यवहार झाला आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, (shooting) याचा तपास सुरू असून, पोलिसांकडून लवकरच या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?
12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?