मान्सूनची आगेकूच महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता?

महाराष्ट्रासह विविध राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. मुंबईतही पावसाचे आगमन झाले असून हवामान विभागाने मुंबईला ४८ तासांचा अलर्ट जारी केला आहे. (Rains) अशातच महाराष्ट्रासाठी हवामानाबाबत आयएमडीने नवा अंदाज जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने मध्य अरबी समुद्राचे उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचे काही भाग तसेच तेलंगणा, ओडिशचे उर्वरित भाग तर छत्तीसगड, झारखंड, बिहारमधील अनेक भाग व्यापले आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढत असून महाराष्ट्र आणि छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातील काही भागात पुढील २-३ दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (Rains) तर त्यापुढील ३-४ दिवसांत झारखंड आणि बिहारचे उर्वरित भाग तसेच उत्तर प्रदेशातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात राज्यात धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड,परभणी, जालना, संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव,सिंधुदुर्ग, रायगड,मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

नाशिक घाटमाथा, नंदुरबार धुळे, नांदेड, हिंगोली आणि परभणी वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांना बुधवारी यलो अलर्ट जारी केला आहे. यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोकणात रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः कोकण-गोवा भागात आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर २३ ते २८ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Rains) तसेच २६ आणि २७ जून दरम्यान कर्नाटकच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि, विदर्भ आणि लगतच्या भागांत पुढील काही दिवस तीव्र उष्णता कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने पुढील ४८ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे, काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दिवसाचे तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा :

समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?

विधान परिषदेचा 17 जागांचा निकाल जाहीर?

प्रशासनाकडून पाणी व्यवस्थापनाचा बोजवारा?