कोल्हापुरात दिवसभर जलधारा कुंभी धरण क्षेत्रात अतिवृष्टी?

कोल्हापुरात मान्सूनचे दमदार पुनरागमन झाले आहे. मंगळवारी शहरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता; (Kolhapur) तर दुपारनंतर सरींचा जोर वाढला. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड आणि आजरा तालुक्यांत चांगला पाऊस झाला. गेल्या आठ तासांत कुंभी धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली असून शुक्रवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. (Kolhapur) सायंकाळी जोर वाढल्याने प्रमुख चौक व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. वाऱ्यामुळे व पावसामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६.५ मि.मी., तर शहरात ११ मि.मी. पावसाची नोंद झाली. पाटगाव, राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा आणि कासारी धरण क्षेत्रातही पावसाने जोर धरला.

पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे. (Kolhapur) पाण्याची उपलब्धता असलेल्या भागांत आठवडाभरात भात रोप लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे. भुईमूग व सोयाबीनच्या पेरण्या मार्गी लागण्याची आशा व्यक्त होत असून नाचणीच्या तरव्यांची कामेही सुरू झाली आहेत. बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?

विधान परिषदेचा 17 जागांचा निकाल जाहीर?

प्रशासनाकडून पाणी व्यवस्थापनाचा बोजवारा?