घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

नाशिकमध्ये लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. (unconscious) तर दुसरीकडे मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नाशिकच्या खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात १६ वर्षीय श्रावणी पाटील हिने घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. (unconscious) लसीकरणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रशासन सत्य लपवत असल्याचाही आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. चौकशीसाठी विशेष वैद्यकीय पथक नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यभर लसीकरण मोहीम राबवणाऱ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. दहा लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला लसीनंतर गंभीर रिअॅक्शन येऊ शकते, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. (unconscious) चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संपूर्ण लसीकरण मोहीम देखील थांबवण्यात आली असून श्रावणीच्या मृत्यूच नेमकं कारण काय? हे अहवालातून स्पष्ट होणार असल्यानं अहवालात नेमकं काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?