राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन?

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. लोकराजांचा जयंती सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे दि. २६ जून रोजी दिमाखात साजरा होत आहे.(kolhapur) यानिमित्ताने जन्मभूमी कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान, शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस), दसरा चौकातील शाहू पुतळा, राजर्षी शाहू स्मारक भवन यांसह ठिकठिकाणची स्मारके विद्युत रोषणाईने आणि शाहूंच्या फलकांनी सजविण्यात आली आहेत.

जन्मस्थळी अभिवादन अन् समता दिंडी कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ (लक्ष्मीविलास पॅलेस) येथे सकाळी ८ वाजता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळास भेट देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे. (kolhapur)यानंतर साडेआठ वाजता, सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीचा प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, आयुक्त राजेंद्र भारूड , सहायक आयुक्त सचिन साळे यांच्यासह विविध प्रशासकीय विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत होईल. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘जागर समतेचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता, देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात हा कार्यक्रम होईल. शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी पोवाडा पथक व अलंकार कला अकादमी फाऊंडेशनतर्फे शाहिरी, लोकसंगीत आणि प्रबोधन कलाविष्काराचे सादरीकरण होणार आहे.

राजर्षी शाहू स्मारक भवनच्या नूतनीकरणाचे उद्‌घा‌टन राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाच्या नूतनीकरण कामाचे उद्‌घाटन शुक्रवारी (दि.२६) सकाळी साडेनऊ वाजता, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते होईल. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांना राजर्षी शाहू मरणोत्तर पुरस्कार राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दि.२६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता, शाहू स्मारकभवन येथे ज्येष्ठ इतिहास संशोधक स्व. डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोत्तर) ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.

शाक्य संघातर्फे मानवंदना आणि लाडू वाटप लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सणासारखी साजरा करा, असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. (kolhapur) त्यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांतील शाक्य संघाचे ७५ निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि २५ महिला विशेष ड्रेसकोडमध्ये उपस्थित राहून राजर्षी शाहूंना मानवंदना देणार आहेत. शुक्रवार, दि. २६ जून रोजी सकाळी ८ वाजता, शाहू जन्मस्थळ (लक्ष्मीविलास पॅलेस) कसबा बावडा येथे, सकाळी ९ वाजता, दसरा चौकातील राजर्षी शाहू पुतळ्याला मानवंदना देऊन लाडू वाटप करून आनंदोत्सव करतील. यावेळी अशोकराव दिलपाक (सोलापूर), अरुण मोहोळ (दौंड), गोविंद जगताप, राजू नाईकनवरे व शकुंतला गायकवाड (पुणे) आदी उपस्थित राहणार आहेत. उपक्रमासाठी शाहू सलोखा मंचचे वसंतराव मुळीक, बबनराव रानगे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.

हेही वाचा :

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?