लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांनाही अर्जाची संधी नाही?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सोलापूरात या योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. (Women) त्यामधल्या काही पात्र महिलांपर्यंत दर महिन्याला मिळणारा १५०० रूपयांच्या पोहोचत नसल्यामुळे त्या महिला अनेक दिवसांपासून बालविकास विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातल्या ११ लाख ३० हजार ५६३ महिलांना या योजनेचा लाभ सुरुवातीला मिळाला. त्यासाठी राज्य सरकारकडून महिन्याला १६९ कोटी रुपये वितरीत केले होते. पण नुकत्याच झालेल्या ईकेवायसी पडताळणीत मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरल्या आहेत. (Women)त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे आणि जिल्ह्यासाठी लागणारा निधीही कमी झाला आहे.लाडकी बहीण योजनेच्या अटींनुसार चारचाकी वाहन असलेल्या महिला, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिला, २१ वर्षांखालच्या किंवा ६५ वर्षांवरच्या महिला तसेच इतर काही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळ्यात आलं आहे.

लाडकीच्या योजनेत आणखी एक महत्वाची समस्या समोर आली आहे. योजना सुरू झाली तेव्हा १९ किंवा २० वर्षांच्या असलेल्या अनेत तरुणी आता २१ वर्षांच्या झाल्या आहेत. नियमानुसार त्या योजनेसाठी पात्र आहेत. पण नवीन अर्ज प्रक्रिया सुरू नसल्यामुळे त्यांना अर्ज करता येत नाही. त्यामुळे बऱ्याच पात्र तरुणींना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.पडताळणीनंतर अनेक महिलांचा लाभ बंद झाला. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याची तक्रार केली आहे. (Women) त्यामुळे महिला थेट महिला व बालविकास कार्यालयात जाऊन चौकशी करत आहेत. पण लाभ कधी सुरू होईल याची कोणतीही अधिकृत माहिती अधिकाऱ्यांकडे स्पष्ट नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन पात्र महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आता महिलांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?