मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आहे. राज्यातल्या सर्वच लाभार्थी महिला योजनेचा लाभ घेतात. (women) सध्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही. त्यांसदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पात्र महिलांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा रखडलेला हप्ता १२ ते १५ जुलैदरम्यान पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण याबद्दल राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनवर काय निर्णय झाला तसेच राज्यातल्या सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीच्या मदतीने प्रत्येकी १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. (women) त्यामुळे अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दुसरीकडे, ई-केवायसी पडताळणीनंतर राज्यातल्या जवळपास ८० लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे या महिलांना सध्या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची शक्यता आहे. (women) दरम्यान सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या सुमारास लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. पण यावेळी जून महिन्याचा हप्ता उशीराने मिळत असल्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलेले आहे. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?