बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

रविवार म्हणजे सहसा बँकांना सुट्टी असते. मात्र, यावेळी 27 सप्टेंबरला रविवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू राहणार आहेत. कारण 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान बँक कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. (holiday) त्यामुळे बँकेत महत्त्वाचे काम असेल, तर सोमवारपर्यंत थांबण्याऐवजी रविवारचा दिवस वापरून ते काम पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी सोयीचे ठरणार आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ने 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँकांच्या शाखांमधील सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्याआधी 26 सप्टेंबरला चौथा शनिवार आणि 27 सप्टेंबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. अशा परिस्थितीत सलग पाच दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 27 सप्टेंबरला रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या असून, ग्राहकांनी आपली आवश्यक बँकिंग कामे शक्य असल्यास आधीच पूर्ण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (holiday) त्यामुळे रविवारनंतर सरळ पुढच्या आठवड्यात गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी बँकांचे व्यवहार नियमितपणे सुरू होण्याची शक्यता आहे.

बँकांनी काय सांगितले भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि यूको बँक यांसह अनेक बँकांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. शाखांमध्ये कर्मचारी उपलब्धता कमी असल्याने काउंटरवरील सेवांवर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे रोख रकमेची गरज असल्यास ग्राहकांनी ATM आणि कॅश डिपॉझिट मशीनचा वापर करावा. पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे आणि इतर डिजिटल व्यवहारांसाठी मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि UPIचा वापर करता येईल. या डिजिटल सेवा 24 तास सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

कोणत्या बँकांवर परिणाम या संपात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबतच क्षेत्रीय ग्रामीण बँकांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. काही जुन्या खासगी बँकांच्या कामकाजावरही परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, कर्नाटक बँकेनेही कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बँक कर्मचारी संपावर का UFBUकडून अनेक प्रलंबित मागण्यांसाठी या संपाचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये आठवड्यात 5 दिवस बँकिंग सेवा, पेन्शन अपडेट, तसेच NPS अंतर्गत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय अशा मागण्यांचा समावेश आहे. (holiday) त्यामुळे शाखेत जाऊन करायचे महत्त्वाचे काम असल्यास 27 सप्टेंबरच्या रविवारी ते करून घेणे, हा सध्याच्या वेळापत्रकानुसार अधिक सोयीचा पर्याय ठरू शकतो. मात्र, डिजिटल व्यवहारांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांचा वापर 28 ते 30 सप्टेंबरदरम्यानही करता येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?

सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?