बँक खात्याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. बँक खात्यात पैसे ठेवण्याआधी बचतीचा गोल्डन नियम समजून घ्या.

अनेक जण त्यांच्या कमाईचा महत्वाचा भाग बचत खात्यात ठेवतात. (bank account) अनेकांना बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित वाटते. परंतु बँक खात्यात जास्त पैसे ठेवणेही नुकसानदायक ठरू शकते. अनेकांच्या मनात बचत खात्यात किती पैसे ठेवले पाहिजे, याबाबत अनेक शंका असतात. या बचत खात्यातील पैसे कधी खर्च केले पाहिजे, याविषयाचा विशेष गोल्डन नियम जाणून घ्या. बचत खाते अनेकांच्या आर्थिक सुरक्षेचा पाया आहे. खरंतर याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही या खात्यातून कधीही पैसे काढू शकता. या खात्यात पैसे ठेवल्याने व्याज देखील मिळते. वेगवेगळ्या बँकेत बचत खात्याच्या व्याजदरात फरक पाहायला मिळतो. पगार, बिल भरणे, दररोजच्या छोट्या-मोठ्या खर्चासाठी बचत खाते महत्त्वाचे ठरते. बचत खात्यात फक्त 1 ते 2 महिन्याच्या खर्चाचे पैसे ठेवणे फायदेशीर ठरू शकते. (bank account) यासाठी तुम्ही 50/30/20 गोल्डन नियमांचं पालन करू शकता.
काय आहे 50/30/20 बजेटिंगचा नियम?
50 टक्के भाग : घर भाडे, इएमआय, महिन्याचे रेशनची किंमत, विजेचं बिल, विमा, शिक्षण, इतर खर्चाचे पैसे ठेवणे फायदेशीर ठरेल.
30 टक्के भाग : हॉटेल जेवण, पिकनिक आणि मनोरंजनासाठी पैसे ठेवू शकता.
20 टक्के भाग : आपत्कालीन फंड, म्यूचुअल फंड, एफडी किंवा भविष्यासाठी गुंतवणूक
तुम्ही बचत खात्यात गरजेपेक्षा अधिक पैसे ठेवल्यास नुकसानदायक ठरू शकते. महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. परंतु सरकारी आणि खासगी बँकेचं व्याज हे महागाई दरापेक्षा कमी असते. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या पैशांची क्रयशक्ती दरवर्षी कमी होते. कमी व्याज दर असलेल्या खात्यात पैसे ठेवण्याऐवजी एफडी किंवा जादा व्याजदार मिळणाऱ्या योजनेत पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. (bank account) अचानक नोकरी गमावल्यानंतर या फंडचा वापर करता येऊ शकतो. मेडिकल इमरजेंसी असतानाही या पैशांचा वापर करता येईल. घर किंवा वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी बचत खात्यातील पैसे वापरता येऊ शकते.
हेही वाचा :
इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?