सकाळच्या वेळेत नकळत आपल्याकडून काही अशा चुका घडतात ज्या हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात. भारतात दररोज हजारो लोक या आजारामुळे मृत पावले असून (heart attack) वेळीच आपल्या सवयीत बदल करणे महत्त्वाचे ठरते

देशात हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत असून याविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे.रोजच्या काही सवयी हृदयावरील ताण वाढवत असतात.या सवयी वेळीच बदलल्यास आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.हृदयाचे रोग आता फक्त वृद्ध लोकांपर्यंतच मर्यादित राहिले नसून तरुणांनाही याचा त्रास जाणवू लागला आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, तणाव आणि अपुरी झोप यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅकच्या घटना फार वाढल्या आहेत. भारतात हृदयविकाराच्या घटना वेगाने वाढत असून जागतिक हृदयविकाराच्या मृत्यूंपैकी २०% वाटा भारताचा आहे. एका अहवालानुसार, भारतात रोज १७५ लोकांच्या हार्ट अटॅकने मृत्यू होतो. (heart attack) अशात आपल्या आरोग्याची आपण जास्त काळजी घ्यायला हवी. सकाळची वेळ आपल्या हृदयासाठी खूप संवेदनशील मानली जाते. खरंतर या काळात रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या वाढतात ज्यामुळे हृदयावर ताम येऊ लागतो. अशात सकाळच्या वेळी केलेल्या काही साध्या चुकाही आपल्या हृदयावरील दबाव वाढवू शकतात ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. बऱ्याचदा या सामान्य सवयी आपल्याला मोठ्या वाटत नाहीत पण यांचा पुढे जाऊन आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. चला सकाळच्या वेळी केलेल्या कोणत्या चुका हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात ते तज्ञांकडून जाणून घेऊया.
डॉ. अमर सिंघल यांच्या मते, अनेकजण बिछाण्याजवळ अलार्म सेट करुन झोपतात आणि अलार्म वाजताच ते एका झटक्यात उठतात. तथापि, झोपेतून उठल्यानंतर सामान्य स्थितीत येण्यासाठी शरीराला थोड्या वेळेची गरज असते. अचानक झोपेतून उठून उभे राह्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, चक्कर येऊ शकते, अस्वस्थता आणि हृदयावरील ताण वाढू शकतो. (heart attack) यामुळेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार, कधीही झोपेतून उठल्यानंतर किमान १ मिनिटे बिछान्यावर बसून रहावे आणि मग हळूच उठून दिवसाची सुरुवात करावी.सकाळी उठताच मोबाईल वापरणे अनेकांना सकाळी उठताच तोंडासमोर स्मार्टफोन उघडण्याची फार सवय आहे. लोक आधी आंघोळ किंवा ब्रश करत नाही कर स्मार्टफोनवर रिल्स स्क्रोल करु लागतात. तुम्हालाही ही सवय असल्याच वेळीच ती मोडा. झोपेतून उठताच स्मार्टफोन वापरल्याने मेंदूवरील दाब वाढतो आणि मानसिक तणाव निर्माण होऊ लागतो. यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर देखील वाढू लागते. ही सवय लगेच तुमच्या शरीरावर परिणाम करणार नाही पण हळूहळू तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करेल.
रिकाम्या पोटी काॅफी किंवा चहाचे सेवन अनेकांना सकाळी उठताच काॅफी किंवा चहाचे सेवन करण्याची सवय आहे. सकाळी चहा किंवा काॅफी पिण्यात काही गैर नाही पण याआधी आपण पोटभर नाश्ता करायला हवा. रिकाम्या पोटी चहा किंवा काॅफीचे सेवन हाय ब्लड प्रेशर, हृदयरोगाचा धोका वाढवते. तुम्हाला दररोज काॅफी किंवा चहा पिण्याची सवय असल्यास सर्वात आधी सकाळी पाणी प्या, मग नाश्ता करा आणि मग काॅफी किंवा चहाचे सेवन करा.व्यायाम आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा असतो पण दिवसाच्या सुरुवातीलाच हेवी वर्कआउट नाही तर वार्म-अप एक्सरसाइज करावी. सकाळच्या वेळी शरीर आणि स्नायू पूर्णपणे सक्रिय नसतात ज्यामुळे जोरात धावणे, हेवी वेटलिफ्टिंग करणे किंवा अतिताणाचे व्यायाम करणे यामुळे हृदयावरील ताण वाढू शकतो. तज्ञांनुसार, सुरुवातीला स्ट्रेंचिग आणि हलके कमी ताणाचे व्यायाम करावे.
हेही वाचा :
पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?
कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?
30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?