राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः 4 जुलैपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. (rains) काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांतील पावसामुळे राज्यातील शेतीकामांना वेग आला असून (rains) अनेक भागांमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली आहे. ज्या भागांत पुरेशी ओल निर्माण झाली आहे, तेथील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीत व्यस्त आहेत. आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतीची कामे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.(rains) दरम्यान, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा लक्षात घेऊन शेतात काम करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, वादळी वातावरणात झाडाखाली आश्रय घेणे टाळावे तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसामुळे काही भागांत नदी-नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?