सोशल मीडियावर सध्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटांबाबत एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 2005 पूर्वी छापलेल्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार असून, हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या दाव्याला विश्वासार्हता मिळावी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून एक कथित नोटिफिकेशनही सोशल मीडियावर फिरवले जात आहे. (printed) त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र या व्हायरल दाव्याची पडताळणी केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले आहे. आरबीआयने 2005 पूर्वी छापलेल्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांवर कोणतीही बंदी घातलेली नाही. या नोटा सध्या कायदेशीररित्या वैध असून त्या नेहमीप्रमाणे व्यवहारात वापरता येतात. (printed) अशा प्रकारचा कोणताही अधिकृत निर्णय किंवा परिपत्रक आरबीआयने जारी केलेले नाही.तसेच बँक ऑफ महाराष्ट्रनेही अशा आशयाचे कोणतेही नोटिफिकेशन किंवा सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे पोस्टर बनावट असून त्याचा बँकेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, चलनासंदर्भातील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला गेला तर त्याची अधिकृत घोषणा आरबीआय आणि संबंधित बँकांकडून केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहणे आवश्यक आहे. (printed) त्यामुळे 2005 पूर्वीच्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावे आणि कोणताही संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता निश्चित करावी.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?