जुना माल, नवे शिक्के! सब घोडे,बारा टक्के!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

त्याच त्याच खड्ड्यामध्ये तोच तोच पुन्हा पाय! जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के! विंदा करंदीकर यांनी 74 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कवितेची पुन्हा तरलपणे आठवण यावी असे सध्या देशात आणि राज्यात राजकारण सुरू आहे. सत्ताकारणासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला असून लोकशाही एका कोपऱ्यात केविलवान्या अवस्थेत उभी असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे. देशाला आणि राज्याला फोडाफोडीचे राजकारण नवे नाही. पूर्वीही ते होते मात्र त्याची गांभीर्याने चर्चा व्हावी असे नव्हते. इसवी सन 2022 नंतर राज्यात फोडाफोडीचे सत्र सुरू झाले.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली (tacit support) त्यानंतर अवघ्या काही महिन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अर्थात हे थोडाफोडीचे राजकारणच होते.

दोन महिन्यापूर्वी पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी ममता बॅनर्जी यांना गुड बाय करून स्वतंत्र गट स्थापन केला. आमदारही फुटले. तर महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून ऑपरेशन टायगर ची चर्चा सुरू होती. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुक समर्थन होते. ऑपरेशन टायगर हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शरद पवार यांनी त्यांचा पक्ष फुटल्यानंतर साथ सोडून गेलेल्या छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह काही प्रमुख आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी फुटी आमदारांचे वाभाडे काढताना मी चुकीच्या लोकांना उमेदवारी दिली अशी कबुली देऊन मतदारांची माफी मागण्यासाठी 2023 मध्ये त्यांनी दौरे केले होते. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे यांनी ओम राजे निंबाळकर, संजय जाधव, संजय दिना पाटील आधी खासदारांच्या मतदार संघात जाहीर सभा घेऊन गद्दारांना उमेदवारी देण्यात माझी चूक झाली असे सांगून त्यांनी मतदारांची माफी मागितली आहे. अर्थात फुटीरांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात सभा घेऊन नंतरच्या निवडणुकीमध्ये त्याचा काही फायदा होत नाही हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. (tacit support) त्यामुळे ऑपरेशन टायगर च्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर सभांमुळे त्यांना त्याचा भविष्यात राजकीय फायदा होईल असे वाटत नाही.

ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाचा एक प्रमुख मोहरा पळवला आहे. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. सचिन अहिर यांचा वरळी मतदारसंघात मोठा प्रभाव आहे आणि भविष्यात आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघ सुरक्षित राहीलच असे नाही. पक्षाच्या चिन्हावर आमदार आणि खासदार झालेल्या मंडळींनी पक्षांतर बंदी कायद्याचा अडथळा येणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन दुसऱ्या पक्षात जाणे सनदशीर असले तरी ते लोकशाहीला पूरक आहे किंवा लोकशाहीचा सन्मान आहे असे कोणीही म्हणणार नाही.

जिकडे सत्ता तिकडे पोळी! जिकडे सत्य तिकडे गोळी! जिकडे टक्के तिकडे टोळी! कोणी कच्चे, कोणी पक्के सब घोडे बारा टक्के असे राजकारण देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे आणि अशा प्रकारच्या राजकारणासाठी कोटी च्या कोटी उड्डाणे होत आहेत. फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला आवडलेले नाही. पण घडते ते पाहण्याशिवाय पर्याय सुद्धा उरलेला नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, नाना पटोले, संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगर बद्दल संताप व्यक्त केला आहे. पण असा संताप व्यक्त करताना “आई नेक आणि बाप एक असला पाहिजे”असे वक्तव्य करताना आपण स्त्रीत्वाचा अपमान करत आहोत (tacit support) याचे भानही कुणाला राहिलेले नाही. असे खेदाने म्हणावे लागेल.खासदार का फुटतात?आमदार साथ का सोडतात? त्याला पक्षप्रमुख म्हणून आपली कार्यशैली कारणभूत ठरते आहे काय? कारण टाळी एका हाताने वाजत नाही. संबंधितांनी संबंधितांना गद्दार म्हणून राग व्यक्त करताना आत्मपरीक्षणही केले पाहिजे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये?

पुणे-नाशिककरांनो रेल्वे संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी?

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?