वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज तब्बल १,४०० दिंड्यांना मिळणार प्रत्येकी २०,००० रुपयांचे अनुदान?

आषाढी वारी निमित्त राज्य सरकारने वारकरी संप्रदायासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे मानाच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेसाठी एकूण 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यासंदर्भातील शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत होणार निधी वितरण लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा सोहळा असलेल्या आषाढी वारीची तयारी राज्यभर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या मानाच्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेसाठी 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या निर्णयाची माहिती दिली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि सामाजिक समतेचा महत्त्वाचा आधार आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. त्यांच्या प्रवासात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, (Warkari) यासाठी 2024 मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले होते. या महामंडळाच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

प्रशासनाची तयारी; पालख्यांचे प्रस्थान सुरू यंदाच्या वारीत मानाच्या 10 पालख्यांसोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचे वितरण आणि संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्याची (Warkari) जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून राज्याच्या विविध भागांतून वारकऱ्यांनी पायी वारीला सुरुवात केली आहे. बुलढाणा येथून श्री संत गजानन महाराज तसेच जळगाव येथून संत मुक्ताई यांच्या पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत. (Warkari) लवकरच देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुख्य पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन वारकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण केली असून वारकरी परंपरेचे जतन आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?