एक किलो भुईमुगाच्या शेंगातून किती तेल मिळते?

बाजारात आपल्याला शेंगदान्याच्या तेलाच्या किमतीमध्ये बऱ्याचदा मोठा बदल दिसतो. बाजारात भुईमुगाच्या शेंगा 100 ते 130 रुपये किलो मिळत आहेत. एका किलो शेंगांमधून नक्की किती तेल निघते आणि त्याची नक्की प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊयात.

बाजारात सध्या शेंगदाण्याच्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. (groundnut oil) त्यामध्येच इराण आणि अमेरिका युद्धात खाद्यतेलाचेही भाव वाढत आहेत. बाजारात भुईमुगाच्या शेंगा 100 ते 130 रुपये किलो मिळत आहेत. जर आपण भाजी मंडईत या शेंगा घेतल्या तर यापेक्षाही अधिक स्वस्त मिळतील. मात्र, या शेंग्यांपासून तयार केलेले तेल 400 ते 450 मिली लीटर आहे. पण मग बाजारात शेंगदाणा तेलाचे 250 मिलीलीटरचे पाकीट 50 ते 70 रुपयांना कसे विकले जाते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी, शेंगदाण्यापासून तेल निर्मिती प्रक्रिया कशी केली जाते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. चांगल्या शेंगा असतील तर त्याच्यातून 45 ते 50 टक्के तेल निघते. पण यंत्रामधून सर्वच तेल बाहेर येत नाही. लाकडी दाबयंत्र किंवा कोल्ड प्रेस पद्धतीतून 350 ते 420 मिलीलीटर तेल मिळते. एक्सपेलर पद्धतीतून 400-480 मिलीलीटर तेल मिळते.

तेल निघाल्यानंतर जी उरलेले पेंड असते ते जनावरांचे खाद्य किंवा सेंद्रिय खत म्हणूनही त्याचा वापर हा केला जातो. शेंगदाण्याचे संपूर्ण मूल्य केवळ तेलातच नसते, त्याच्या टरफलातही असते. आपल्याला अनेक दुकानांमध्ये 50 ते 60 रुपयांना मिळणारे 250 मिली तेल पाहून धक्का बसतो. इतक्या कमी दरात तेल कसे विकले जाते. चला तर मग त्यामागील अगदी सोपी कारणे जाणून घेऊयात.बाजारात विकली जाणारी सर्वच तेल शुद्ध असतात. कारखान्यांमध्ये या तेलाचे उत्पादन केले जाते. (groundnut oil) जास्त उत्पादन असेल तर प्रति लीटरवरील खर्च हा कमी होतो. तेल काढल्यानंतर त्याची पेंड विकली जाते, त्यातूनही पैसा मिळतो. त्यामुळे उत्पन्न ते फक्त तेलावरच अवलंबून नाही. मुळात म्हणजे मोठे कारखानदार थेट शेतकऱ्यांकडून भुईमुगाच्या शेंगा खरेदी करतात. ज्यामुळे स्वस्त मिळतात.

हजारो टनाची खरेदी शेतकऱ्यांकडून शेंगांची केली जाते, (groundnut oil) ज्यामुळे कच्च्या मालाची किमत कमी राहते. जास्त विक्री आणि नफा कमी असला तरीही उत्पन्न वाढल्याने थेट नफा अधिक मिळतो. लाकडी घाण्यातून तेल हळूहळू काढले जाते. त्याच्यावर रासायनिक शुद्धीकरण केले जात नाही, ज्यामुळे खर्च कमी होतो. एक किलो भुईमुगाच्या शेंगातून साधारणपणे 400 ते 450 मिलीलीटर तेल मिळते. बाजारात मिळणारे तेल शुद्धीकरण प्रक्रिया केलेले असते. लाकडी घाण्यातून काढलेले तेल खरे असते पण त्याचे प्रमाण कमी असते आणि खर्च अधिक असतो. त्यामुळे त्याची किमत अधिक असते.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?