ATM पिन नेहमी 4 अंकीच का असतो ?

आजच्या डिजिटल युगात एटीएम कार्ड वापरताना प्रत्येकजण चार अंकी पिन टाकतो. मात्र हा पिन नेमका चार अंकीच का असतो, पाच किंवा सहा अंकी का नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. (ATM card) यामागे तांत्रिक कारणांपेक्षा एक रंजक आणि मानवी कथा दडलेली आहे.जगातील पहिले एटीएम स्कॉटलंडचे अभियंता जॉन शेफर्ड-बॅरन यांनी विकसित केले. 27 जून 1967 रोजी लंडनमधील बार्कलेज बँकेच्या शाखेबाहेर पहिले एटीएम सुरू करण्यात आले. बँक बंद झाल्यामुळे पैसे काढता न आल्याचा अनुभव आणि चॉकलेट देणाऱ्या व्हेंडिंग मशीनमधून मिळालेली प्रेरणा यामुळे त्यांनी एटीएमची संकल्पना विकसित केली.

एटीएम तयार झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता, मशीनला खातेदाराची ओळख कशी पटणार? यासाठी जॉन शेफर्ड-बॅरन यांनी पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) ही संकल्पना मांडली. सुरुवातीला त्यांनी सहा अंकी पिन ठेवण्याचा विचार केला होता. अधिक अंक असल्यास सुरक्षा अधिक मजबूत राहील, असे त्यांना वाटत होते.मात्र हा निर्णय त्यांच्या पत्नी कॅरोलिन यांच्या एका सूचनेमुळे बदलला. सहा अंकी पिन लक्षात ठेवणे अवघड जात असल्याचे त्यांनी सांगितले आणि चार अंकी क्रमांक सहज लक्षात राहतो, असे मत व्यक्त केले. सामान्य ग्राहकांनाही अशीच अडचण येऊ शकते, हे लक्षात घेऊन जॉन शेफर्ड-बॅरन यांनी चार अंकी पिनच अंतिम करण्याचा निर्णय घेतला.(ATM card) यानंतर एटीएमचा वापर जगभर वाढला आणि चार अंकी पिन हीच पद्धत सर्वत्र स्वीकारली गेली. आजही बहुतांश देशांमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी चार अंकी पिनच वापरला जातो. तांत्रिकदृष्ट्या पाहता सहा अंकी पिन अधिक सुरक्षित मानला जातो, कारण चार अंकी पिनमध्ये 10 हजार संभाव्य क्रमांक असतात, तर सहा अंकी पिनमध्ये ही संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचते.

तरीही ग्राहकांच्या सोयीला प्राधान्य देत बँकांनी चार अंकी पिनची पद्धत कायम ठेवली. (ATM card) याशिवाय सलग तीन वेळा चुकीचा पिन टाकल्यास कार्ड तात्पुरते ब्लॉक होण्याची व्यवस्था असल्याने अंदाजाने पिन शोधणे जवळपास अशक्य ठरते. त्यामुळे वापरण्यास सोपा आणि पुरेसा सुरक्षित असा समतोल साधणारा पर्याय म्हणून चार अंकी पिन आजही कायम आहे.यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरानंतरही एटीएम पिनचे महत्त्व कमी झालेले नाही. तब्बल सहा दशकांपूर्वी घेतलेला हा छोटासा निर्णय आजही जगभरातील कोट्यवधी ग्राहकांच्या बँक व्यवहारांचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?