खरेदीसाठी सुवर्णसंधी ,सोन्याचे आजचे भाव पाहून मोह आवरणार नाही, 10 ग्रॅम सोनं?

देशभरात सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून,(gold) बहुतेक प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. 9 जुलै रोजी सकाळी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,270 रुपये किमतीवर आला, तर मुंबईमध्ये तो 1,43,120 प्रति 10 रुपये ग्रॅम नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,056.24 डॉलर प्रति औंस इतका आहे. पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे महागाईबाबतची चिंता पुन्हा वाढली असून, अमेरिकन बाँड यिल्ड आणि डॉलर मजबूत झाले आहेत. परिणामी, जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,270 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,31,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई आणि कोलकाता या दोन शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,31,190 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये सोनं महाग आहे. तिथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,540 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,43,120 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा किंमत 1,31,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 131340
मुंबई 131190
अहमदाबाद 131240
चेन्नई 132490
कोलकाता 131190
हैदराबाद 131190
जयपुर 131340
भोपाळ 131240
लखनऊ 131340
चंदीगड 131340

चांदीचे भाव:सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही सातत्याने घसरण होत(gold) असल्याचे दिसून आले. 9 जुलैच्या सकाळी चांदीचा दर 2,44,900 रुपये प्रति किलो इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरची किंमत 58.61 डॉलर प्रति औंस इतकी आहे. देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींवर स्थानिक घटकांबरोबरच जागतिक आर्थिक घडामोडींचाही मोठा प्रभाव पडतो.

हेही वाचा :

इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?

E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन खराब होणार का?