मगरीच्या जबड्यात अडकलं सिंहाचं मुंडकं, मृत्यूसाठी तडफडत राहिला जंगलाचा राजा पण शेवटी जे घडलं… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

मगरीच्या जबड्यात अडकलं सिंहाचं डोकं, हताश झाला (crocodile’s)जंगलाचा राजा अन् मगरीने थेट जबडाच केला बंद. जंगलातील शिकारीत राजाचा झालेला पराभव आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जंगलात कधी काय घडेल आणि आपल्यासमोर याचे कोणते नवे दृश्य(crocodile’s) येईल ते सांगता येत नाही. जंगलातील शिकारीचे अनेक थरार नेहमीच सोशल मीडियावर शेअर केले जातात ज्यात जंगलातील शिकाऱ्यांनी जंगलावर वर्चस्व गाजवल्याचे दिसून येते. पण आता मात्र इथे एक नवीन आणि सर्वांना थक्क करणारे दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्यात जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाची शिकार एका मगरीने केल्याचे दिसून येत आहे. सिंह हा मुळातच जंगलातील सर्वात बलवान आणि शक्तिशाली प्राणी आहे अशात मगरीच्या हातून त्याचा शेवट सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरत आहे. व्हिडिओत नक्की काय दिसून आलं याविषयी चला जरा सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते यात नदीकिनारी काही मगरी पाण्यात पोहत असल्याचे दिसते आणि यातच नदीकिनाऱ्यावरील मगरीच्या जबड्यात सिंह अडकून आपल्या जीवाची भीक मागताना दिसून येत आहे. मगरीच्या जबडा उघडा आहे आणि यात सिंहाचं डोकं फार वाईटरित्या अडकलं आहे. व्हिडिओमध्ये पुढे मगर आपला जबडा जोरात बंद करतानाही दिसून येते ज्यामुळे अडकलेल्या सिंहाला नक्कीच मरणाच्या वेदना जाणवल्या असतील. तो हताश होऊन आपल्या मृत्यूची वाट पाहत असतो कारण ज्याप्रकारे तो यात अडकलेला असतो त्यातून त्याची सुटका होणे जवळजवळ अशक्य असते. बरं जंगलातील ही लढाई अनेकांना खरी वाटत असली तरी काहींनी मात्र हा व्हिडिओ एआय क्रिएटेड असल्याचा दावा केला आहे. काय खरं, काय खोटं हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी हे दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच शेअर केलं जात आहे. लोक सिंहाची केविलवाणी हार पाहून हळहळ व्यक्त करत आहेत.

जंगलातील आयुष्य हे फार वेगळे असते, इथे कधी कुणाचा डाव कसा (crocodile’s)उलटा पडेल ते सांगता येत नाही आणि हेच आपल्याला आताच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. सिंहाने आजवर अनेकांची शिकार केली असली तरी त्याचा शेवटही दुसऱ्या शिकाऱ्याच्या हाती घडला, हे दृश्य जंगलातील क्रूर गूढतेचे सत्य प्रतिबिंबित करते. हा व्हायरल व्हिडिओ @AnimalNmlfckng नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते फेक दिसत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचारा सिंह, मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?”.

हेही वाचा :

महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य