मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ

भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.(meet)अल्पवयीन मुलीसोबत मैत्री, नंतर भेटायला बोलावून नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीनं आपल्या आईला आपबिती सांगितली. संतापलेल्या आईनं थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.पीडित मुलगी वय वर्ष १५ भंडाऱ्यातील अड्याळ पोलिस ठाणे परिसरातील रहिवासी आहे. तर, आरिफ मेश्राम २१ असं आरोपीचं नाव आहे. तो भंडारा तालुक्यातील कवडसी या गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, अंकुशने मुलीला भेटण्यासाठी भंडारा येथे बोलावले.

ठरलेल्या ठिकाणी दोघेही भेटले. नंतर अकुंशने तिला स्वतःच्या घरी नेले. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत त्यानं मुलीवर अत्याचार केला. तसेच जबरदस्ती केली. (meet)नंतर तिला पुन्हा भंडारा बसस्टॉपवर सोडून दिले. पीडितेनं त्यानंतर घरी जात आईला सगळी हकीकत सांगितली. याची माहिती आईला कळताच त्यांच्या पायाची खालची जमीन सरकली.

त्यांनी थेट अड्याळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. (meet)पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून, अड्याळ पोलिसांनी आरीफविरुद्ध, पळवून नेणे, अत्याचार करणे यासह कलम १३७(२), ६४(१), ६५ (१) भारतीय न्याय संहिता सहकलम ४, ६ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल मांदाळे करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर

महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर