धावत्या बसला अचानक आग, चालकाच्या हुशारीने मोठा अनर्थ टळला 37 प्रवासी सुखरुप

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात धावत्या एसटी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुर्डुवाडी-बार्शी मार्गावरील चिंकहिल गावाजवळ हा प्रकार घडला. (shocking) आगीने काही वेळातच संपूर्ण बसला विळखा घातला आणि बस जळून खाक झाली. मात्र, चालकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक तरुणांच्या मदतीमुळे बसमधील ३७ प्रवाशांचे प्राण वाचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर-पुणे मार्गावर धावणाऱ्या या एसटी बसमधून ३७ प्रवासी प्रवास करत होते. प्रवास सुरू असतानाच बसला अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस रस्त्याच्या बाजूला थांबवली. बसमध्ये आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. (shocking) मात्र, वेळेत बस थांबवल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली.

या घटनेदरम्यान पत्रकार हर्षल बागल यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. बसला आग लागल्याचे पाहताच त्यांनी आजूबाजूच्या तरुणांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. स्वतः बसमध्ये प्रवेश करून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यांच्या धाडसी प्रयत्नांना उपस्थित तरुणांनीही सहकार्य केले. त्यामुळे बसमधील सर्व ३७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. (shocking) मात्र, तोपर्यंत आगीने संपूर्ण बसला आपल्या विळख्यात घेतले होते. या दुर्घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.बसचालकाने दाखवलेली सतर्कता, पत्रकार हर्षल बागल यांचे धाडस आणि स्थानिक तरुणांनी केलेली मदत यामुळे ३७ प्रवाशांना जीवदान मिळाले. या घटनेनंतर चालकासह मदतीसाठी धावून आलेल्या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट