बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक बच्चन कुटुंबीय आहे. अवघं बच्चन कुटुंब कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. सध्या अभिषेक बच्चन चर्चेत आहे. कारण आहे, त्याचा ‘कालीधर लापता’ चित्रपट. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गुढ उकललं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिनेत्याने मुलाखतीत घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे. आजवर बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अभिषेक- ऐश्वर्याच्या घटस्फोटावर(divorce) प्रतिक्रिया दिली नाही.

सध्या ‘कालीधर लापता’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिषेक बच्चन व्यग्र आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याने सांगितलं की, “२००७ साली रिलीज झालेला ‘गुरु’ चित्रपट माझ्या करियरसाठी खूप स्पेशल होता. पण माझ्या खासगी खासगी आयुष्यासाठीही तो चित्रपट फार महत्वाचा ठरला. त्या चित्रपटाचा न्यूयॉर्कमध्ये प्रीमियर होता. प्रीमियरनंतर मी ऐश्वर्याला न्यूयॉर्कमध्येच प्रपोज केलं होतं(divorce). माझ्यासाठी जवळपास सगळेच चित्रपट वैयक्तिकदृष्ट्या महत्वाचे राहिले आहेत, याची मला खात्री आहे.”
पुढे अभिषेक म्हणाला की, “कदाचित एक किंवा दोन चित्रपट असे असतील जे माझ्या वैयक्तिकदृष्ट्या महत्वाचे राहिले आहेत. पण माझा नियम असा आहे की ते वैयक्तिक असले पाहिजेत. जर ते वैयक्तिक नसेल तर मी कदाचित ते करणार नाही.” सोशल मीडियावर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिषेकने अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नकारात्मक आणि खोट्या गोष्टींना तो कशापद्धतीने तोंड देतो हे सांगितले. त्याच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीकडे तो का लक्ष देत नाही असे विचारले असता, “खोटी माहिती पसरवणाऱ्या लोकांना सत्य ऐकण्यात क्वचितच रस असतो,” असा अभिनेत्याने खुलासा केला.
अभिषेक म्हणाला की पूर्वी या गोष्टी त्याच्यावर परिणाम करत नव्हत्या, पण आता माझ्या फॅमिलीवर खोट्या अफवांचा खूप परिणाम होतो. जेव्हा तो गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होते हे स्पष्ट करताना अभिषेक म्हणाला, “मी काही क्लिअर केले तरी लोकं त्याचं काही तरी वेगळंच करतील, कारण निगेटिव्ह बातम्या विकल्या जातात. तुम्ही म्हणजे मी नाहीय. तुम्ही माझे जीवन जगत नाही. ज्या लोकांना मी जबाबदार आहे त्यांच्यासमोर तुम्ही जबाबदार नाही. अशा निगेटिव्हिटीचा प्रसार करणाऱ्या लोकांना त्यांच्या अंतरात्मासोबत जगावे लागते. जे लोक अशी नकारात्मकता पसरवतात त्यांनी जरा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”
हेही वाचा :
लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट
ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral
बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral