महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. (Maharashtra) अशातच उल्हासनगर महानगरपालिकेने विद्यार्थीनींसाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे, ज्यातून ६,००० रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर महानगरपालिकेने विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि (Maharashtra) त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी ‘ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना’ महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत सातवी ते बारावीच्या पात्र विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपये शैक्षणिक मदत मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक वर्ष सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून विद्यार्थिनींच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी दूर होतील, असा उल्हासनगर महापालिकेचा उद्देश आहे. (Maharashtra) दरम्यान, ही योजना सुरू होण्यापूर्वी १९ हजार विद्यार्थिनींची नोंद झाली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. महायुतीच्या माध्यमातून सदरील योजना राबविण्यात येत असली तरी भाजपचे नगरसेवक आणि उपमहापौर यावेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत संघर्ष दिसून आला.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अॅटम बॉम्ब मोठी खळबळ