राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, बळीराजाला लवकरच ५००० रुपये दुष्काळी मदत मिळणार आहे. बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. (farmers) यामुळे १.५० कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिवाळीच्या आधीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचंही सरकारने जाहीर केलं होतं. त्यामुळे या 5 हजार रुपयांच्या मदतीकडे बळीराजाचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता बळीराजाची ही प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. बळीराजाला लवकरच 5 हजार रुपये मिळणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मदत कधी द्यायची यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
राज्यातील 1.50 कोटी शेतकऱ्यांना 5000 रुपये दुष्काळी मदत देण्यात येणार आहे. ही अग्रिम मदत असणार आहे. (farmers) त्यानंतरही सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा, असे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दुष्काळी मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी 7500 कोटी रुपये एकूण खर्च होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. शेतकऱ्यांना खात्यात पैसे आल्यानंतर ते पैसे कापून घेऊ नका, असे स्पष्ट आदेशच बँकांना द्या, असे निर्देशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (farmers) त्यामुळे शेतकऱ्यांकडून या पैशातून कोणतीही वसुली केली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दुष्काळ निवारणासाठी उपया योजना दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच या तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी उपाय योजना करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले होते.
उपाय योजना काय :
जमीन महसूलात सूट
पीक कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट (7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स पुरवणार
टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही
शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार
जनावरांच्या चार्याची व्यवस्था करणार
जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार
पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अॅटम बॉम्ब मोठी खळबळ