थलपती विजय यांची पत्नी संगीताने काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाची याचिका मागे घेतली. (divorce) त्यानंतर आता त्यांचा मुलगा जेसन संजय पहिल्यांदाच आई आणि वडिलांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यांच्या कुटुंबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा रंगल्या आहेत. विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने काही दिवसांपूर्वीच त्यांच्याविरोधातील घटस्फोटाची याचिका मागे घेतली. आता त्यांचा मुलगा जेसन संजयने आई-वडिलांसोबतच्या नात्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कुटुंब चर्चेत आलं आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत असलेल्या जेसन संजयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आई संगीता आणि बहीण दिव्या साशासोबतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. आई माझ्या आयुष्यातील खंबीर आधारस्तंभ असल्याचं त्याने सांगितलं आहे.आईबद्दल बोलताना जेसन म्हणाला, “माझी आई माझ्या आयुष्यातील खूप मोठा आधारस्तंभ आहे. (divorce) कधी कदी मी स्वत:चा विचार करायलाही विसरतो. पण ती 24 तास माझा आणि माझ्या बहिणीचा विचार करत असते. मी जर एखादा दिवस तिला फोन केला नाही तरी ती स्वत:हून संपर्क साधते आणि आयुष्यात काय सुरू आहे याची विचारपूस करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आईला भाग व्हायचं असतं.”
आईसोबत नातं अतिशय जवळचं असलं तरी प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत शेअर करण्याइतकी मैत्री नाही, असं जेसनने स्पष्टपणे सांगितलं. काही गोष्टी सांगताना आई काय प्रतिक्रिया देईल, याची भीती वाटते, असंही त्याने कबूल केलं. “मी आई किंवा बाबांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करू शकेन इतकी जवळची मैत्री आमच्यात नाही”, असं तो म्हणाला. मात्र दोघांमध्ये प्रामाणिकपणा असल्याचं त्याने आवर्जून सांगितलं.जेसनच्या मते (divorce) त्याचा सर्वांत जवळचा मित्र कुटुंबातील एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे त्याची धाकटी बहीण दिव्या साशा. दोघं लहानपणी खूप भांडायचे. आमचं नातं अगदी उंदीर आणि मांजरासारखं होतं, असं त्याने सांगितलं. मात्र आता दिव्या कॉलेजमध्ये असून जेसन चेन्नईत असल्यामुळे दोघांमध्ये अंतर वाढलं आहे. त्यामुळे एकमेकांची जास्त आठवण येते, असं तो म्हणाला.जेसन संजय लवकरच दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. ‘सिग्मा’ या चित्रपटात संदीप किशन मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा सर्वांत आधी जेसनने त्याची बहीण दिव्यालाच ऐकवली होती. तिचं मत नेहमी प्रामाणिक असतं आणि त्यामुळे तिच्या प्रतिक्रियेला त्याच्यासाठी विशेष महत्त्व असल्याचं त्याने सांगितलं.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?