इस्रायल/इराण युद्धात, आता अमेरिका उतरली

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या दहा दिवसांपासून इसराइल आणि इराण यांच्यात घमासान युद्ध(war) सुरू आहे. गाझापट्टी उध्वस्त केल्यानंतर, लेबेनांवर अचूक हल्ला केल्यानंतर, इराणला कायमची अद्दल घडवण्यासाठी इस्रायलने इराणची राजधानी तेहरान सह अन्य प्रमुख शहरांवर हल्ले सुरू केले. पण इराण कडून तितक्याच तीव्रतेने प्रतिहल्ले सुरू झाल्यावर इस्रायलचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संघटनेच्या मुख्यालयावर इराणने हल्ला करताना जागतिक बंदी असलेल्या क्लस्टर बॉम्बचा पहिल्यांदाच वापर केला. आणि त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघासह जगभरातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. आता तर इसराइल ची बाजू घेऊन अमेरिका या युद्धात थेट उतरली आहे. अमेरिकेच्या या कृतीने जग तिसऱ्या महायुद्धाच्या (war)तोंडावर उभे राहणार की काय अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

आज पर्यंतच्या युद्धात अमेरिकेने इसराइल ची बाजू घेऊन सर्व प्रकारची रसद पुरवली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध भडकल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात इस्राईलच्या बाजूने उतरावयाचे की नाही याचा निर्णय येत्या दोन आठवड्यात घेतला जाईल असे सांगितले होते. पण अवघ्या काही तासात ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली आणि अमेरिकेतील हवाई तळावरून अमेरिकेने इराणच्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रे डागली.

युद्धात थेट उडी घेतल्यानंतर ट्रम्प यांनी इराणचे प्रमुख आयाततुला खोमेनी यांनी शरणागती पत्करावी. युद्ध थांबवावे असे आवाहन केल्यानंतर रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आमचे युद्ध चालू राहील. सुरुवात इस्रायल ने केली आहे आणि शेवट आम्ही करू अशी धमकी खोमेनी यांनी दिली आहे.

इराण कडे समृद्ध युरेनियम आहे. त्याचा उपयोग न्यूक्लियर कार्यक्रमासाठी गुप्तपणे केला जात असल्याचा संशय अमेरिकेला आहे. आणि मध्यपूर्वेत (पश्चिम आशियात) कोणत्याही इस्लामीक राष्ट्राकडे अणुबॉम्ब असता कामा नयेत. त्यांनी अण्वस्त्रधारी होता कामा नये अशी इस्रायल ची प्रथम पासूनची भूमिका आहे. काही वर्षांपूर्वी इराकची अनुभट्टी इस्रायलने हल्ला करून उध्वस्त केली होती. इराणने गुप्तपणे अण्वस्त्रे तयार केली आहेत. याची माहिती मोसाद या गुप्तचर संघटनेने गोळा केलेली आहे. आणि म्हणूनच इस्रायलने इराणकडे आता आपला मोर्चा वळवला आहे.

जगात एकूण 53 इस्लामिक देश आहेत. त्यामध्ये पाकिस्तान हा एकमेव अण्वस्त्रधारी देश असून, त्याच्या जोरावर पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्रांचे नेतृत्व स्वतःकडे घ्यावयाचे आहे. अशा स्थितीत इराण अण्वस्त्रधारी बनला तर पाकिस्तानचे महत्व संपणार आहे. आणि म्हणूनच इराणला न्यूक्लियर कार्यक्रमापासून माघार घ्यायला लावणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठीच पाकिस्तान या युद्धात(war) अप्रत्यक्षपणे अमेरिकेला साथ देत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना राज शिष्टाचार बाजूला ठेवून व्हाईट हाऊस मध्ये मेजवानी दिली होती. विशेष म्हणजे याच इराणची शस्त्रे पाकिस्तान कडे आहेत. तथापि अणवस्त्र कार्यक्रमापासून इराणला रोखणे यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे.

इराण हा आधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज आहे. त्याच्याकडे क्लस्टर बॉम्ब आहेत. वेळ पडली तर काही दिवसात अण्वस्त्र तो बनवू शकतो. जगाने युद्धामध्ये(war) क्लस्टर बॉम्ब चा वापर करावयाचा नाही असा ठराव करण्यात आला आहे. तथापि हा ठराव पायदळी तुडवून इराणने क्लस्टर बॉम्ब इस्रायलवर टाकले आहेत. त्यामुळे इसराइल चे भयंकर नुकसान झाले आहे. इस्रायल ची हवाई सुरक्षा प्रणाली भेदून इराणने इस्राईलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.

इस्रायलच्या काही शहरांमधील नागरिकांना बंकर चा आधार घ्यावा लागतो आहे. याचा अर्थ इराणने तोडीस तोड जबाब द्यायला सुरुवात केली आहे असा होतो. आणि म्हणूनच दोन आठवड्यानंतर आपण निर्णय घेऊ असे सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासातच आपली भूमिका बदलून युद्धात(war) थेट उडी घेतली आहे. अमेरिकेच्या काही हवाई तळावरून इराणच्या शहरांवर प्रक्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे इराणची अवस्था बिकट झाली असल्याचे चित्र आहे.

इसराइल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडालेला असतानाच इराणचे सर्वोच्च नेते आयातुला खोमेनी यांनी आपला उत्तराधिकारी शोधण्यास प्रारंभ केला असून तिघा जणांची नावे त्यांनी सुचित केली आहेत. युद्ध अधिक तीव्र होत असताना तिघांपैकी कुणालातरी एकाला आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर करून खोमेनी हे बाजूला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम नेमका कुठे आहे हे मोसादच्या गुप्तचरांनी शोधून काढले आहे. आणि याच तळावर इस्राईल कडून जोरदार हल्ले सुरू आहेत. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम उध्वस्त करून टाकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून इस्रायल व अमेरिकेकडून संयुक्तपणे हल्ले सुरू आहेत. चीन, रशिया, उत्तर कोरिया यांनी अमेरिकेच्या या थेट हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली आहेच, शिवाय आम्ही इराणच्या बाजूने प्रसंगी उभे राहू असा इशारा दिला आहे आणि म्हणूनच या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभे राहणार की काय अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

हेही वाचा :

“जा जा…” म्हणत अंगावर गेला, डोळे दाखवले मैदानात सिराज-ब्रुक भिडले! बाचाबाचीचा Video Viral

Jio च्या या प्लॅनने घातलाय धुमाकूळ! संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी आणि रोज 2.5GB इंटरनेट

Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?