इराण मुद्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवीन भूमिका घेतली आहे. हे एकप्रकारे हार मानण्यासारखं आहे. इस्रायलसाठी सुद्धा हा मोठा झटका आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांजवळ ही इच्छा बोलून दाखवली आहे.

इराणची अणवस्त्र क्षमता संपवणं या एकमेव उद्देशाने अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात युद्ध सुरु केलं होतं. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्याचं मुद्यावरुन माघार घेणार आहेत. इराण सोबत अणवस्त्र डील न करताच अमेरिकेला हे युद्ध संपवायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांजवळ ही इच्छा बोलून दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे अमेरिकेचा हा सर्वात मोठा पराभव आहे. कारण लक्ष्य साध्य न करताच ते मैदानातून पळ काढत आहेत. त्याशिवाय इस्रायलसाठी सुद्धा हा झटका आहे. इराणचा अणवस्त्र कार्यक्रम हाच दोन्ही देशांसाठी युद्धाचं मुख्य कारण होता. इराण नेहमीच इस्रायलवर अणूबॉम्ब टाकण्याची धमकी देत आला आहे. (Donald Trump) त्यामुळे इस्रायलने पद्धतशीरपणे कित्येक वर्ष वेगवेगळ्या मार्गांनी इराणचा अणवस्त्र कार्यक्रम उधळून लावला. पण आता ट्रम्प इराणशी अणवस्त्र डील न करता माघार घेत असतील, तर त्यामुळे इस्रायलला इराणपासून असलेला धोका कायम राहणार आहे.
इराण विरुद्ध सैन्य कारवाई थांबवून डोनाल्ड ट्रम्प यांना रणनितीमध्ये बदल करायचा आहे. वॉशिंग्टन आता तेहरानवर आर्थिक दबाव टाकण्याच्या रणनितीवर काम करणार आहे. रविवार ‘एक्सियोस’ ला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली नवीन भूमिका सांगितली. इराणची विस्कटणारी आर्थिक घडी आणि तिथल्या महागाईवर आमची बारीक नजर आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं. इराणमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीयत. ही गोष्ट ध्यानात घेऊन आम्ही शांत आहोत. (Donald Trump) त्यांच्यासोबत अंशत: चर्चा सुरु आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार, इराणची आर्थिक स्थिती खूप खराब आहे. त्यांच्याकडे सैनिकांचं वेतन देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयत. अमेरिकी नौदलाच्या नाकेबंदीने तेहरानच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढवला आहे. इराणवर सैन्य कारवाई करण्याऐवजी (Donald Trump) त्यांच्यावर आर्थिक आणि कूटनितीक दबाव टाकण्याचा आखातामधील मित्र देशांनी सल्ला दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण विरुद्ध युद्ध लढताना अमेरिकेचा मिसाइल स्टॉक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याच्या बातम्या अलीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका स्वीकारण्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकतं.
हेही वाचा :
कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?