सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कॉर्पोरेट(elastic pricing) हितसंबंधांना प्रोत्साहन दिले आहे. या संपाची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या संपात 25 कोटींहून अधिक कामगार सामील होतील.

नवी दिल्ली : देशभरातील सुमारे 25 कोटींहून अधिक कर्मचारी आज देशव्यापी संपावर जाणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर जात असल्याने याचा परिणाम थेट सेवांवर होणार आहे.(elastic pricing) या संपात बँकिंग, विमा, टपाल सेवांपासून ते कोळसा खाणींपर्यंतचे कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे याचा सर्वसामान्यांना फटका बसेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने या संपाला ‘भारत बंद’ असे म्हटले आहे.
संसदेने मंजूर केलेले चार नवीन कामगार कायदे कामगारांचे अनेक अधिकार हिरावून घेतात असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या सर्वांच्या विरोधात हा बंद काढला जात आहे.(elastic pricing) या बंदचा फटका अनेक सेवांना बसणार आहे. मात्र, अनेक शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कार्यालये खुली राहण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी वाहतूक आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय आल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचे नियोजन केले आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कॉर्पोरेट हितसंबंधांना प्रोत्साहन दिले आहे. या संपाची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या संपात 25 कोटींहून अधिक कामगार सामील होतील. शेतकरी आणि ग्रामीण कामगारही देशभरात निदर्शने करतील. कामगार संघटना खाजगीकरण आणि ४ नवीन कामगार संहितांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचाही संपाला पाठिंबा असणार आहे.
सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष
गेल्या वर्षी कामगार संघटनांनी कामगार मंत्री मनसुख मनसुख मांडवीय यांना 17 मागण्यांची यादी सादर केली होती. सरकारने या मागण्यांकडे कोणतेही लक्ष दिले नाही, असा त्यांचा आरोप आहे. गेल्या दशकापासून वार्षिक कामगार परिषददेखील आयोजित करण्यात आलेली नाही.
काय सुरु आणि काय बंद राहील?
कामगार संघटनांच्या संपादरम्यान बँकिंग सेवा, टपाल सेवा, विमा सेवांवर परिणाम होईल. याशिवाय सरकारी वाहतूकदेखील प्रभावित होईल. शेअर बाजारासोबतच सराफा बाजारही सुरु
हेही वाचा :
राज्यात लवकरच ‘या’ पदांसाठी महाभरती होणार; फडणवीसांनी दिली गुडन्यूज
सावधान! आज राज्यात जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट