चिकन खाल्लं, त्यानंतर दही पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू?

सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावात संशयित विषबाधेमुळे वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चिकनचे जेवण केल्यानंतर दही खाल्ल्यानंतर दोघांची प्रकृती अचानक बिघडली होती. (poisoning) उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आता दहा दिवसांनी पतीचाही मृत्यू झाल्याने या घटनेतील गूढ आणखी गडद झाले आहे. विषबाधेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

२८ जून रोजी रात्री वृद्ध दाम्पत्याने घरी चिकनचे जेवण केले. त्यानंतर त्यांनी दही खाल्ले आणि काही वेळातच दोघांनाही उलट्या, अस्वस्थता आणि प्रकृती बिघडल्याची लक्षणे जाणवू लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ६८ वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा मृत्यू झाला होता.(poisoning) त्यानंतर त्यांच्या पती शांताराम ह्याळीज यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचाही मृत्यू झाला.

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आखतवाडे गावात भेट देत संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत. (poisoning) मात्र अद्याप प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झालेला नसल्याने मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अधिकारी आणि एफडीए यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत असून अहवालानंतरच विषबाधा अन्नातून झाली की इतर कोणत्या कारणामुळे, याचा उलगडा होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?

E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन खराब होणार का?