स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या चाकूच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.(Standards) गंजलेल्या किंवा खराब चाकूंचा वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

फूड-ग्रेड उपकरणांचा वापर अनिवार्य भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण च्या नव्या नियमांनुसार अन्न तयार करताना वापरण्यात येणारे चाकू, ब्लेड आणि इतर कटिंग उपकरणे फूड-ग्रेड, विषारी नसलेली आणि गंजरोधक असणे आवश्यक आहे. फळे, भाज्या किंवा इतर खाद्यपदार्थांची कापणी, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि साठवणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांची गुणवत्ता सुरक्षित असणे बंधनकारक करण्यात आली आहे. अशा उपकरणांमुळे अन्न दूषित होण्याचा धोका कमी होतो आणि ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करता येते.
FSSAI च्या निदर्शनास आले की काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये गंजलेले, तुटलेले किंवा खराब झालेले चाकू आणि ब्लेड वापरले जात आहेत. अशा उपकरणांमधून अन्नामध्ये गंजाचे कण, हानिकारक रसायने किंवा जंतू मिसळण्याची शक्यता असते. (Standards) त्यामुळे तयार होणारे अन्न असुरक्षित बनू शकते. यामुळे अन्न तयार करताना केवळ चांगल्या स्थितीतील आणि फूड-ग्रेड कटिंग उपकरणांचाच वापर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.
आरोग्यावरील परिणाम आणि नियमभंगाची कारवाई गंजलेल्या चाकूने फळे किंवा भाज्या कापल्यास गंजाचे सूक्ष्म कण अन्नामध्ये मिसळू शकतात. अशा प्रकारचे अन्न वारंवार सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गंजलेल्या पृष्ठभागावर जीवाणू आणि घाण सहज साचत असल्याने अन्नामध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, गॅस, फूड पॉइझनिंग तसेच इतर संसर्गजन्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय तुटलेल्या किंवा गंजलेल्या चाकूंमध्ये निर्माण झालेल्या भेगांमध्ये घाण साचल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढतो. (Standards) अशा चाकूंमुळे अन्नाची चव आणि गुणवत्ता देखील बिघडू शकते.FSSAI ने स्पष्ट केले आहे की तपासणीदरम्यान कोणत्याही अन्न व्यवसायात खराब किंवा गंजलेली कटिंग उपकरणे आढळल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. घरगुती वापरासाठीही चाकूवर गंज दिसताच तो बदलणे, प्रत्येक वापरानंतर स्वच्छ धुवून कोरडा ठेवणे, ओला चाकू दीर्घकाळ न ठेवणे, स्टेनलेस स्टीलचे दर्जेदार चाकू वापरणे आणि त्यांची स्थिती नियमित तपासणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?