मोठी बातमी भाजपमध्ये हालचालींना वेग, रात्री पार पडली मंत्र्यांची महत्वाची बैठक

भाजपच्या संघटनात्मक विस्तारासाठी सर्व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ‘सेवादूत अभियान’ वर चर्चा झाली. जिल्हा आणि तालुका स्तरावरील शासकीय सदस्य नियुक्त्यांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे (meeting) यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती होती. संघटना आणि शासनातील समन्वय वाढविण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. या बैठकीत सेवादूत अभियानाचा आढावा घेण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक विस्तार अधिक व्यापक करण्यासह पक्षाची संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने रात्री उशिरा भाजपच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. (meeting) या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत ‘सेवादूत अभियान’ तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील शासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाचा संघटनात्मक विस्तार तळागाळापर्यंत पोहोचविणे, शासन आणि संघटना यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करणे, (meeting) तसेच सरकारच्या विविध योजना आणि निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे या विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.‘सेवादूत अभियान’च्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क वाढविणे आणि जिल्हा व तालुका स्तरावर संघटनेची व्याप्ती अधिक मजबूत करणे यावर बैठकीत भर देण्यात आला. शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर समन्वयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबतही चर्चा झाली. संघटना आणि शासन यांच्या समन्वयातून जनसेवेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू