मोठी बातमी, विमानाचा भीषण अपघात, क्रॅश झाल्याने क्षणात स्फोट, सर्वच प्रवाशांचा मृत्यू

एक विमान हजारो फूट उंचीवरून थेट जमिनीवर आदळले आहे. प्राथमिक माहितीनुसार अपघात झालेले हे एक लष्करी मालवाहू विमान होते. वेगात हवेत उडणारे विमान जमिनीवर आदळल्यानंतर एकाच सेकंदात मोठा स्फोट झाला.

गेल्या काही दिवसांत भारतासह जगभरात विमान दुर्घटनांचे अनेक धक्कादायक प्रसंग समोर आले आहेत. (accident) काही ठिकाणी तर विमान अपघातांमध्ये पायलटसह सर्वच प्रवासी दगावल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. सध्या अशीच एक हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विमानाच भीषण अपघात झाला असून त्यातील सर्वच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या विमान अपघाताचे हेलावून टाकणारे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

विमान क्रॅश, सगळ्या प्रवाशांचा मृत्यू आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ऱशियातील सायबेरिया प्रांतातील केमेरोवा क्षेत्रात ही भीषण दुर्घटना घडली आहे. (accident) येथे एक विमान हजारो फूट उंचीवरून थेट जमिनीवर आदळले आहे. प्राथमिक माहितीनुसार अपघात झालेले हे एक लष्करी मालवाहू विमान होते. वेगात हवेत उडणारे विमान जमिनीवर आदळल्यानंतर एकाच सेकंदात मोठा स्फोट झाला. आगीचे लोळ आकाशात उठले. यातच सर्व 17 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यागुनोवो गावाजवळ या विमानाचा अपघात रशियन मिडिया इजवेस्तियाने या घटनेची पुष्टी केली आहे. ही घटना घडल्यानंतर त्या भागाचे गव्हर्नर इल्या सेरेड्यूक सविस्तर माहिती दिलीय. संबंधित अपघातग्रस्त विमान हे एक सैन्यविमान होते. केमेरोवा क्षेत्रातील यागुनोवो गावाजवळ या विमानाचा अपघात झाला, असे त्यांनी सांगितले. परंतु हा अपघात नेमका का झाला, याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली नाही.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जागतिक पातळीवर विमान सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. घटना घडताच त्या भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. (accident) परंतु या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झालाय. विमानाचा अपघात नेमका का झाला? तांत्रिक बिघाड झाला की यामागे अन्य काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुसरीकडे तपास संस्थांनी विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. लवकरच यामागचे खरे कारण समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू