प्रत्येकाची आपली स्वतः ची कार असावी, असे स्वप्न असते.(Vehicle)त्यामुळे अनेकजण कार खरेदी करतात. काही जणांना लक्झरी कार खूप आवडतात. त्यामुळे ते महागड्या कार घेतात. जर तुम्हीही कार खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आता उद्यापासून वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे.३० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विद्युत वाहनांना आणि पेट्रोल डिझेलवरील वाहनांच्या किंमती वाढणार आहेत.राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्यात आला होता. १ जुलैपासून ३० लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या विद्युत वाहनांवर ६ टक्के कर आकारला जाणार आहे.

सीएनजी-एलपीजी, पेट्रोल डिझेलवरील वाहनांवरील कर १ टक्क्याचे वाढवण्यात येणार आहे. याबाबत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी माहिती दिली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवरील वाहनांची संख्या वाढली होती. विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यावर ६ टक्के सवलत देण्यात आली होती. (Vehicle)त्यानंतर आता ही सवलत पुन्हा मागे घेण्यात आली आहे.
महसुलवाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Vehicle)आता सीएनजी आणि एलपीजी वाहने खरेदी करताना अतिरिक्त १ टक्के कर आकारला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून म्हणजेच उद्यापासून हा निर्णय लागू होणार आहे.सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातच हा निर्णय घेतला होता. त्यानंतर याची अंबलबजावणी उद्यापासून होणार आहे. परंतु यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. जर तुम्ही ३० लाखांपेक्षा जास्त किंमतीची कार घेत असाल तर तुम्हाला ६ टक्के कर भरावा लागणार आहे. जो याआधी आकारला जात नव्हता.
हेही वाचा :
लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट
ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral
बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral